BSNL ब्रॉडब्रॅण्ड प्लानमध्ये मिळतोय पाचपट डेटा

बीएसएनएल कंपनीने पुन्हा एकदा दमदार ब्रॉडब्रॅण्ड प्लान आणलाय.

Updated: Dec 7, 2018, 02:03 PM IST
BSNL ब्रॉडब्रॅण्ड प्लानमध्ये मिळतोय पाचपट डेटा

नवी दिल्ली : बीएसएनएल दर सहा महिन्यांनी आपला ब्रॉडब्रॅण्ड प्लान अपडेट करत असते. हाच ट्रेंड फॉलो करत कंपनीने पुन्हा एकदा दमदार ब्रॉडब्रॅण्ड प्लान आणलाय. कंपनीने यावेळेस केरळसाठी प्लान आणलाय. टेलीकॉम टॉक रिपोर्टनुसार बीएसएनएलने 675 रुपये, 845 रुपये, 999  रुपये, 1,495 रुपये, 1,745 आणि 2,295 रुपयांचा प्लान पुन्हा आणलाय. 

675 रुपयांचा प्लान 

बीएसएनएलने या प्लानमध्ये युजर्सना रोज 5 जीबी डेटा मिळतोय. या प्लानमध्ये युजर्सना 10 एमबीपीएसचा स्पीड डेटा मिळणार. ही लिमिट संपल्यानंतर युजर्सना 2 एमबीपीएसचा स्पीड मिळणार आहे. याआधी युजर्सना केवळ 35 जीबी डेटा मिळायचा. पण आता युजर्सना 150 जीबी डेटा मिळणार आहे. यासोबतच प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग देखील मिळणार आहे. 

845 रुपयांचा प्लान 

 845 रुपयांच्या प्लानमध्ये युजर्सना 10 एमबीपीएस स्पीडने रोज 10 जीबी डेटा मिळणार आहे. या प्लानमध्ये केवळ 50 जीबी डेटा मिळायचा. आता या प्लानमध्ये अनलिमिटेड वॉईस कॉलिंग सुविधाही मिळणार आहे. 

999 रुपये आणि 1199 रुपयांचा प्लान 

999 रुपयांच्या प्लानमध्ये युजर्सना 15 जीबी डेटा प्रतिदिन मिळणार आहे. हा डेटा 10 एमबीपीएसचा स्पीड मिळणार आहे. तर 1199 रुपयांच्या प्लानमध्ये युजर्सना रोज 20 जीबी डेटा मिळणार आहे. डेटा लिमिट संपल्यानंतर युजर्सना 2 एमबीपीएसचा स्पीड डेटा मिळणार आहे.