मुंबई : डिसेंबर महिना उजाडला की, सगळीकडे एकच प्रश्न विचारला जातो आणि तो म्हणजे काय मग थर्टी फस्टचा प्लान काय? प्रत्येकाचाच अनुभव आहे की, अगदी कितीही महिनाभर अगोदर प्लान केला तरी हा प्लान बनेल मग ते थर्टी फस्ट कसलं. अगदी कितीही कागदावर उतरवला तरी थर्टी फस्टचा प्लान होत नाही.
आणि मग आता अवघ्या 15 दिवसांत कुठे प्लान करणार असा प्रश्न साऱ्यांनाच पडलेला असतो. असं असताना भाडीपा आणि उर्मिला - सुकिर्त आपल्यासाठी भन्नाट थर्टी फस्टचे प्लान घेऊन आलेत. या दोघांचा व्हिडिओ नुकताच आऊट झाला आहे.
थर्टी फस्ट म्हटलं की आपल्याला पहिलं आठवतं ते गोवा... पण आता गोव्यात प्रचंड गर्दी आणि सारखा थर्टी फस्ट गोव्यात काय साजरा करायचा? असं वाटतं असेल तर या दोघांनी आपल्यासाठी भन्नाट प्लान आणले आहेत.
भारतात आणि भारताबाहेर आपण आपला थर्टी फस्टचा प्लान कुठे करू शकतो? याची माहिती त्यांनी या व्हिडिओत दिली आहे. अगदी तसेच कुठे कमी दरात तुम्हाला राहायला मिळेल? किंवा तुम्ही प्रवास कसा करू शकता? या ना अशा असंख्य प्रश्नांची उत्तर या दोघांनी या व्हिडिओत दिली आहेत.
गँगटोक, मॅकलोडगंज, कुर्ग, उदयपुर, कोस्टल कर्नाटका यासारख्या जागांची माहिती दिली आहे. या आणि अशा वेगळ्या ठिकाणी नववर्षाचं स्वागत करायची ही संकल्पनाच मुळी भन्नाट आहे. हा व्हिडिओ सध्या नेटीझन्सच्या पसंतीला उतरत आहे.
तर आता थर्टी फस्टचा काही प्लान नाही असं न म्हणता हे प्लान वर्क आऊट करायला सुरूवात करा.