नवी दिल्ली : मिड-रेंजमध्ये स्मार्टफोन विवो वाय 50 Vivo Y50 भारतात लॉन्च करण्यात आला आहे. विवोच्या या स्मार्टफोनची विक्री भारतात 10 जूनपासून सुरु होणार आहे. Vivo Y50 सर्वात आधी एप्रिल महिन्यात कंबोडियामध्ये लॉन्च करण्यात होता. भारतात फोनची विक्री ई-कॉमर्स साईट्स आणि ऑफलाईन स्टोअर्समध्ये या आठवड्यापासून सुरु होणार.
काय आहेत Vivo Y50 चे फिचर्स -
- 8 जीबी रॅम + 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज
- होल पंच डिझाइनसह 6.53 इंची एचडी डिस्प्ले
- क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसर
- Android 10 Funtouch OS 10
- 5000 mAh बॅटरी
- यूएसबी टाईप सी पोर्ट
- फिंगरप्रिंट सेन्सर
- 5 कॅमेरा सेटअप
13 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा सेन्सर
120 डिग्री फिल्ड-ऑफ-व्ह्यूसह 8 मेगापिक्सल वाईड ऍन्गल कॅमेरा
2 मेगापिक्सल पोट्रेट कॅमेरा सेन्सर
2 मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा सेन्सर
सेल्फीसाठी 16 मेगापिक्सल फ्रन्ट कॅमेरा सेन्सर
Vivo Y50 आयरिस ब्लू आणि पर्ल व्हाईट रंगात उपलब्ध आहे. भारतात Vivo Y50ची किंमत 17,990 रुपये इतकी आहे. 10 जूनपासून फ्लिपकार्ट, अमेझॉन, पेटीएम, विवो इंडिया, टाटा क्लिक या ई-स्टोरमध्ये फोनची ऑनलाईन विक्री सुरु होणार आहे.