Maruti Suzuki च्या Maruti Ertiga Tour M कारचं डिझेल मॉडेल लॉन्च

जाणून घ्या किंमत...

Updated: Oct 14, 2019, 05:42 PM IST
Maruti Suzuki च्या  Maruti Ertiga Tour M कारचं डिझेल मॉडेल लॉन्च

नवी दिल्ली : मारुती सुझुकीने 'मारुती एर्टिगा टूर एम' (Maruti Ertiga Tour M Diesel) कारचं डिझेल मॉडेल लॉन्च केलं आहे. कंपनीने याची सुरुवातीची एक्सशोरुम किंमत ९.८१ लाख रुपये इतकी ठेवली आहे. याच वर्षी कंपनीने मे महिन्यात या कारचं पेट्रोल मॉडेल ८ लाख रुपयांत लॉन्च केलं होतं. त्यानंतर जुलै महिन्यात या कारचं सीएनजी मॉडेल लॉन्च केलं होतं. सीएनजी मॉडेलची किंमत ८.८३ लाख इतकी होती. 

ही कार VDi trimवर आधारित आहे. या कारची मागणी शक्यतो व्यावसायिक हेतूने केली जाते. डिझेल मॉडेलमध्ये ही कार सफेद, सिल्व्हर आणि काळ्या रंगात उपलब्ध आहे. १.५ लीटर DDiS 225 turbocharged motor इंजिन आहे.   

Maruti Ertiga Tour M Diesel कारचं मायलेज २४.२ किलोमीटर प्रति लीटर आहे. याच्या सीएनजी मॉडेलचं मायलेज २६.२० किलोमीटर, तर कारचं पेट्रोल मॉडेल १८.१८ किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते.

rushlaneने दिलेल्या वृत्तानुसार, सात सीटर असणाऱ्या या कारमध्ये मॅन्युअल एसी, दोन एयरबॅग, सेंट्रल लॉकिंग, मॅक्सिमम स्पीड लिमिट सिस्टम, स्पीड सेंन्सेटिव्हिटी, ऑटो डोअर लॉक यांसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. याशिवाय कारमध्ये डिजिटल लॉक-अनलॉक सिस्टम, डिजिटल क्लॉकही देण्यात आला आहे.