स्पीड लिमिटिंग डिव्हाईससोबत आली 'सिलेरियो'ची नवी गाडी

'मारुती सुझुकी'नं सिलेरियो हॅचबॅकचं नवं टॅक्सी व्हर्जन 'टुअर एच २' बाजारात सादर केलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 2, 2018, 02:47 PM IST
स्पीड लिमिटिंग डिव्हाईससोबत आली 'सिलेरियो'ची नवी गाडी title=

नवी दिल्ली : 'मारुती सुझुकी'नं सिलेरियो हॅचबॅकचं नवं टॅक्सी व्हर्जन 'टुअर एच २' बाजारात सादर केलंय.

'टूअर एच २'ही गाडी सिलेरियोच्या LXi (O) व्हेरियंटवर आधारलेली आहे. विशेष करून कॅब अॅग्रीगेटर्सला नजरेसमोर ठेऊन या गाडीची रचना करण्यात आलीय. 

'टूअर एच २'मधेय स्पीड लिमिटिंग डिव्हाईस जोडण्यात आलंय. भारत सरकारच्या नियमांनुसार, टॅक्सीमध्ये हे डिव्हाईस लावणं अनिवार्य आहे. रस्ते अपघात टाळण्याच्या दृष्टीनं सरकारनं हे पाऊल उचललंय. 

या गाडीचा टॉप स्पीड ८० किलोमीटर प्रति तास आहे. तर यामध्ये १.० लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आलंय जे ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसहीत आहे. इंजिन ६८ हॉर्सपावर आमि ९० न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करू शकते. 

या गाडीची दिल्लीत एक्स शोरुम किंमत ४.२१ लाख रुपये आहे.