Maruti Suzuki Fronx Price Specifications Features: देशामध्ये नुकत्याच पार पडलेल्या ऑटो एक्सपो 2023 (Auto Expo 2023) मध्ये मारुती सुझुकीने आपली फ्रोंक्स क्रॉसओव्हर (Maruti Suzuki) गाडी पहिल्यांदाच जगासमोर आणली. या गाडीची बुकिंग केवळ 11 हजारांमध्ये करता येणार आहे. आतापर्यंत या गाडीचे 5500 युनिट्स बुक झाले आहेत. मारुती ही कार एप्रिल महिन्यात लॉन्च करणार आहे. ही गाडी नेक्सा स्टोअरच्या माध्यमातून रिटेलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
मारुतीने आपल्या क्रॉसओव्हर कारमध्ये 9 कलरचा पर्याय देण्यात आला आहे. यामध्ये 6 सिंगल कलर पर्याय आहेत ज्यात नेक्सा ब्लू, आर्टीक व्हाइट, ऑपलेट रेड, ग्रेडेयर अर्थेन ब्राऊन, स्प्लेंडिड सिलव्हरसारख्या रंगाचा समावेश आहे. तर ड्युएल टोन कलर पर्यायांमध्ये 3 ड्यूएल टोन देण्यात आले आहेत. ज्यामध्ये अर्थन ब्राउनबरोबर ब्लूइश ब्लॅक, ऑपलेंट रेडबरोबरच ब्लूइश ब्लॅक आणि स्प्लेंडिड सिलव्हरबरोबरच ब्लूइश ब्लॅक रंगाचा पर्याय देण्यात आला आहे.
सुझुकीच्या फ्रोंक्स कारच्या डिझाइनबद्दल बोलायचं झालं तर या नव्या क्रॉसओव्हरमध्ये क्रोम फिनिशींगबरोबरच नव्या ग्रील पहायला मिळणार आहेत. यामुळे गाडीला भन्नाट लूक आला आहे. याशिवाय यामध्ये एलईडी हेडलॅम्पबरोबरच एलईडी डीआरएल, क्रोमबरोबरच फ्रंट आणि बॅक बंपर, सिलव्हर कलर साइड फ्रोफाइलबरोबरच रुफ रेल्स, ड्युएल टोन ओआरवीएम आणि 16 इंचाचे अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.
या कारच्या इंटीरियरबद्दल बोलायचं झाल्यास यामध्ये ड्युएल टोन थीमबरोबरच सिलव्हर कलर मेटल फिनिशींग पहायला मिळतो. तसेच अनेक फिचर्स या गाडीच्या इंटीरियरमध्ये देण्यात आले आहेत. यामध्ये 9 इंचाचा स्मार्ट प्ले प्रो प्लस टचस्क्रीन इंन्फोमेंट सिस्टीम, कंट्रोलिंग फीचर्सबरोबरच थ्री स्पोक स्टेअरिंग व्हिल, हेड-अप डिस्प्ले, एअर व्हेंट्स, वायरलेस चार्जर आणि 360 डिग्री कॅमेराही या गाडीच्या इंटीरियरमध्ये देण्यात आला आहे.
या कारमध्ये कंपनीने इंजिनचे दोन पर्याय देण्यात आले आहेत. पहिला पर्याय 1.2 लीटर ड्युएल जेट पेट्रोल इंजिन आणि दुसरा पर्याय 1.0 लीटर बूस्टरजेट पेट्रोल इंजिनचा आहे. यापैकी 1.2 लीटरचं इंजिन 89 बीपीएच पॉवर आणि 113 एमएम चा टॉर्क निर्माण करण्यास सक्षम असून या इंजिनसोबत 5 स्पीड मॅन्युएल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गेअरचा पर्याय देण्यात आला आहे. तर 1.0 लीटरच्या इंजिनमध्ये 99 बीपीएच पॉवर आणि 147 एनएम टॉर्क निर्माण करण्याची क्षमता आहे. या दुसऱ्या इंजिनबरोबर 5 स्पीड मॅन्युएल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक टॉर्क कनव्हर्टर देण्यात आला आहे.
या कारमध्ये कंपनीने अनेक सेफ्टी फिचर्स दिले आहेत. यात हिल होल्ट असिस्ट, जेटा आणि अल्फा व्हेरिएंट्समध्ये 6 एअरबॅग्स, एबीएसबरोबर ईबीडी ब्रेक असिटंट आणि आयसोफिक्ससारखे फिचर्स देण्यात आले आहेत. मारुती सुझुकी फ्रोक्स एप्रिल महिन्यात लॉन्च झाल्यानंतर ही कार मारुतीच्याच ब्रेझ्झाबरोबरच हुंडाई व्हेन्यू, किआ सोनेट, टाटा नेक्सन, महिंद्रा एक्सयुव्ही 300, निसान मॅग्नाइट आणि रेनॉल्ट काईगरसारख्या कार्सबरोबर स्पर्धा करताना दिसेल.
या गाडीचं बेस मॉडेल 8 लाखांपासून विक्रीसाठी उपलब्ध असेल. तर टॉप मॉडेल 11 लाखांना उपलब्ध होईल.