ग्राहकांची आवडती Maruti Alto आता नव्या स्टाईलमध्ये लाँच, जाणून घ्या फीचर्स

या कारची एंट्री-लेव्हल हॅचबॅक आता एसयूव्ही सारख्या शैलीत दिसणार आहे, त्यामुळे याची उंची ही वाढेल.

Updated: May 1, 2022, 09:25 PM IST
ग्राहकांची आवडती Maruti Alto आता नव्या स्टाईलमध्ये लाँच, जाणून घ्या फीचर्स title=

मुंबई : मारुती सुझुकी अल्टो, जी जवळपास दोन दशकांपासून भारतात सर्वाधिक विकली जाणारी कार आहे. ही अशा कारपैकी एक आहे जिने सर्वसामान्यांचं कार घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. या कारची किंमत कमी असल्यामुळे लोकांच्या खिशाला ती परवडणारी आहे. परंतु आता सर्वांच्या आवडीची ही कार आपल्या नवीन आवतारात लाँच होण्यासाठी तयार झाली आहे.

कंपनी 2022 साठी नवीन मारुती सुझुकी बलेनो आणि विटारा ब्रेझा यासह अनेक कार्सवर काम करत आहे. अल्टो ही देशातील सर्वात लोकप्रिय कार आहे ज्याचे नवीन मॉडेल त्याच्या विक्रीत नक्कीच भर घालणार आहे.

या कारची एंट्री-लेव्हल हॅचबॅक आता एसयूव्ही सारख्या शैलीत दिसणार आहे, त्यामुळे याची उंची ही वाढेल. अवतारामुळे अल्टो केवळ आकारानेच मोठी होणार नाही, तर तिला पूर्वीपेक्षा जास्त केबिनची स्पेस देखील मिळणार आहे.

कारचे मायलेज आणखी वाढणार

2022 मारुती सुझुकी अल्टो नवीनतम पिढीच्या सुझुकी हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर तयार केली गेली आहे, ज्यामुळे या कारचे मायलेज आणखी वाढेल आणि तिचा लोड पूर्वीपेक्षा कमी असेल.

हे देखील समोर आले आहे की, नवीन अल्टो मारुती सुझुकी एस-प्रेसो प्रमाणे बनवली जात आहे, त्यामुळे एस-प्रेसो मधून त्याचे बरेच भाग दिले जाऊ शकतात. मारुती सुझुकीची कार लाइन-अप बरीच विस्तृत आहे, त्यामुळे कारच्या पार्टची अदलाबदल करणे सोपे आहे.

कारच्या या बदललेल्या रुपात डॅशबोर्ड मिळणे अपेक्षित आहे, तसेच त्यात अनेक नवीन फीचर्सही दिले जाऊ शकतात.

कीलेस एंट्री, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यासारखी अनेक वैशिष्ट्ये नवीन अल्टोमध्ये दिली जाऊ शकतात.

सध्याची मारुती सुझुकी ऑल्टोची एक्स-शोरूम 3.15 लाख रुपयांपासून सुरू होत आहे, जी टॉप मॉडेलसाठी 4.82 लाख रुपयांपर्यंत जाते, नवीन पिढीच्या अल्टोच्या किमतींमध्ये उत्कृष्ट वैशिष्ट्ये आणि मजबूत लुकसह काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

भारतीय बाजारपेठेत या कारची स्पर्धा जोरदार आहे. या गाड्या किफायतशीर तर आहेतच, पण त्यांचा मायलेजही खूप मजबूत आहे.

सध्याच्या मॉडेलसह 796 cc पेट्रोल इंजिन

नवीन पिढीच्या अल्टोमध्ये कोणते इंजिन उपलब्ध होईल याची माहिती अद्याप समोर आलेली नाही, परंतु मारुती सुझुकी सध्याच्या मॉडेलसह 3-सिलेंडर 796 सीसी पेट्रोल इंजिन देईल असे मानले जाते. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे आणि 47 Bhp आणि 69 Nm पीक टॉर्क बनवते.

असा अंदाज आहे की मारुती सुझुकी 2022 अल्टो सोबत 1-लिटर के-सिरीज इंजिन देखील देऊ शकते, कंपनीने खूप संशोधन केल्यानंतर हे तयार केले आहे.

या कारचे इंजिन 67 Bhp पॉवर आणि 90 Nm पीक टॉर्क बनवते जे कंपनीने 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड AMT गिअरबॉक्सेससह ऑफर केले आहे. कंपनी नवीन अल्टोचे सीएनजी प्रकारही बाजारात आणू शकते. त्यामुळे इंधन वाढीची समस्या पाहाता. लोकांच्या खिशाला ती परवडणारी आहे.