मारूती सुझुकी स्विफ्ट कार लवकरच होणार लाँच

मारूती सुझुकी इंडिया स्विफ्ट कार लवकरच लाँच करणार आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Jan 18, 2018, 09:25 PM IST
मारूती सुझुकी स्विफ्ट कार लवकरच होणार लाँच  title=

मुंबई : मारूती सुझुकी इंडिया स्विफ्ट कार लवकरच लाँच करणार आहे. 

स्विफ्टचे थर्ड जनरेशन मॉडेल 7 फेब्रुवारी रोजी ऑटो एक्सपो 2018 मध्ये लाँच करणार आहे. तर या स्विफ्टची बुकिंग 18 जानेवारीपासून केली जाणार आहे. या गाडीच्या बुकिंगसाठी 11 हजार रुपयांपासून केली जाऊ शकणार आहे. 

Maruti Swift 2018 interior

याबाबत सिनिअर एक्झिक्युटिव डायरेक्टक आर एस कल्सी यांनी सांगितले की, स्विफ्टचा नवा अवतार हा बोल्ड असून तरूणाईला आपल्याकडे आकर्षित करणारा आहे. स्विफ्टचा हा नवा मॉडेल आंतरराष्ट्रीय बाजारात सुरूवातीपासूनच लोकप्रिय आहे. जुन्या स्विफ्टच्या तुलनेत हे नवे मॉडेल स्पोर्टी आणि स्टायलिश आहे. तसेच यामध्ये 7 इंच टचस्क्रीन आणि एंड्रॉईड ऑटो, अप्पल कार प्ले कनेक्टिविटी ऑपशंस उपलब्ध आहे. 

Maruti Swift 2018 front grille

या गाडीच्या पावरमध्ये फार फरक नाही. नवीन मारूती स्विफ्टमध्ये 1.2 लीटर पेट्रोल आणि 1.3 लीटर डिझेल इंजिनचं ऑप्शन देण्यात आलं आहे. तसेच या वेरिएंट्समध्ये ऑटो गेअर शिफ्टचे पर्याय उपलब्ध आहेत. 

Maruti Swift 2018 AMT transmission