फेसबुककडून युजर्ससाठी मोठी घोषणा; सप्टेंबरमध्ये बंद होतंय'हे' अॅप,आत्ताच सेव्ह करा डेटा

Messenger Lite Shut Down: येत्या सप्टेंबरपासून फेसबुक एक अॅप कायमस्वरुपी बंद करण्याचा विचार करत आहे. काय आहे नेमकं कारण जाणून घ्या. 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 27, 2023, 12:59 PM IST
फेसबुककडून युजर्ससाठी मोठी घोषणा; सप्टेंबरमध्ये बंद होतंय'हे' अॅप,आत्ताच सेव्ह करा डेटा  title=
Meta is shutting down Messenger Lite for Android from September

Messenger Lite: फेसबुक (Facebook) युझर्ससाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मेटा (Meta) कंपनी सप्टेंबरपासून फेसबुकचे एख अॅप कायमस्वरुपी बंद करणार आहे. फेसबुक मॅसेंजरचे  व्हर्जन असलेल्या Messenger Lite अँड्रोइड डिव्हाइससाठी पुढील महिन्यांपासून बंद होणार आहे. TechCrunchच्या रिपोर्टनुसार, मॅसेंजर लाइट अॅपला गुगलकडून या पूर्वीच प्ले स्टोअरमधून हटवण्यात आले होते. मात्र, जे युजर्स आधीपासूनच मॅसेंजर लाइट अॅपचा वापर करत होते त्यांच्या डिव्हाइसमध्ये या अॅप अद्याप सुरू आहे. मात्र, आता 28 सप्टेंबर 2023नंतर या अॅप सपोर्ट करणे बंद होणार आहे. (Messenger Lite Shut Down)

मेटा म्हणजेच फेसबुकने मॅसेंजर लाइट अॅफ 2016मध्ये लाँच केले होते. हे अॅफ युजर्समध्ये भरपूर लोकप्रियदेखील होते. या अॅपमुळं स्टोरेजदेखील वाढत नव्हती. मॅसेंजर लाइट आयओएससाठीदेखील लाँच करण्यात आले होते. मात्र, 2020मध्ये अॅपल युजर्ससाठी बंद करण्यात आले होते. एका रिपोर्टनुसार, मॅसेंजर लाइट अॅपला जगभरातील जवळपास 760 मिलियन लोकांनी डाऊनलोड केले होते. तर, भारतात हे अॅप वापरणारे युजर्स सर्वाधिक होते. या यादीत भारतानंतर ब्राझील आणि इंडोनेशियाचा नंबर लागतो. 

कंपनीने मॅसेंजर अॅपमध्ये अनेक बदल केले होते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 28 सप्टेंबरपासून युजर्स मॅसेंजर अॅप SMSला सपोर्ट करणार नाही. तसंच, कंपनीकडून युजर्सना आणखी एक इशारा देण्यात आला आहे. 28 सप्टेंबरपासून ते या अॅपच्या माध्यमातून मेसेज पाठवण्यास व स्वीकारण्यास असक्षम असणार आहेत. ते मॅसेंजर लाइट अॅपचा वापर करु शकणार नाहीयेत. 

मेटाने जारी केलेल्या एका घोषणेनुसार, कंपनीचा पुढील प्लान हा मॅसेंजर या मूळ अॅपला या वर्षाअखेर एंड टू एंड एन्स्क्रिप्शन बेस्ट डिफॉल्टच्या आधारावर तयार करणे हा आहे. त्यामुळं युजर्सना प्रायव्हसी आणि सिक्युरिटी मिळू शकेल.