अंबानींच्या 'या' कारच्या रंगासाठीचा खर्च पाहून तुमच्या चेहऱ्याचा रंग उडेल; VIP नंबरसाठीही खर्च केलेत लाखो

Mukesh Ambani SUV Painted Cost: देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानींच्या कार कलेक्शनची कायमच चर्चा असते. कोट्यावधी रुपयांच्या कार असलेल्या अंबानींच्या कारच्या देखभालीचा खर्चाही तितकाच जास्त आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 29, 2023, 11:03 AM IST
अंबानींच्या 'या' कारच्या रंगासाठीचा खर्च पाहून तुमच्या चेहऱ्याचा रंग उडेल; VIP नंबरसाठीही खर्च केलेत लाखो title=
अंबानींकडे असलेल्या सर्वात आलीशान कार्समध्ये या कारचा समावेश होतो

Mukesh Ambani SUV Painted Cost: भारतामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचं नाव घेतलं जातं. मुकेश अंबानी हे त्यांच्या श्रीमंतीबरोबरच आलीशान कार कलेक्शनसाठीही प्रसिद्ध आहेत. अगदी रोल्स-रॉयसपासून फेरारीपर्यंत अनेक कार्स अंबानी कुटुंबाकडे आहेत. ज्या ज्या आलीशान कंपन्यांचा तुम्ही विचार कराल त्या सर्वच कंपन्याच्या कार अंबानींच्या कार कलेक्शनमध्ये आहेत. अंबानी यांच्या गाड्यांचा ताफा निघाल्यानंतर अनेकजण अगदी डोळे विस्फारुन या ताफ्यातील गाड्या पाहत असतात. अर्थात आता कार अंबानींची असल्यावर कारची नंबर प्लेटही तितकीच खास असणार. कारच्या नंबर प्लेटचे क्रमांक हे स्पेशल क्रमांक असतात. अंबानीच्या कार्स आणि त्यांच्या किंमतीबद्दल अनेकांना कल्पना असेलही मात्र फार कमी लोकांना अंबानींच्या ताफ्यातील एका कारला केवळ रंग देण्यासाठी तब्बल 1 कोटींचा खर्च करण्यात आला आहे.

कारला रंग देण्यासाठी एक कोटींचा खर्च

रोल्स-रॉयस कुलीनन असं अंबानींच्या ताफ्यातील एका आलीशान गाडीचं नाव असून ही भारतामधील सर्वात महागडी एसयुव्ही कार आहे. अंबानींच्या कार कलेक्शनमध्ये शेकडो गाड्या आहेत. मात्र त्या गाड्याही या एका गाडीच्या रंगकामाच्या खर्चासमोर टिकू शकत नाहीत. कारटॉकने दिलेल्या वृत्तानुसार रोल्स-रॉयस कुलीननला देण्यात आलेल्या टस्कन सन शेडच्या रंगकामासाठी तब्बल 1 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. भारतामध्ये रोल्स-रॉयस कुलीननची किंमत 6.8 कोटी रुपयांपासून सुरु होत असली तरी 21 इंचाच्या चाकांचा रंग, अनेक कस्टमाइज गोष्टींचा समावेश करुन या कारची किंमत तब्बल 13.14 कोटीपर्यंत जाते.

VIP नंबर प्लेट

मुकेश अंबानींच्या या स्पेशल कारची नंबर प्लेटही स्पेशल आहे. या कारसाठी '0001' हा स्पेशल रजिस्ट्रेशन क्रमांकही विकत घेण्यात आला आङे. कारच्या केवळ या स्पेशल नंबरसाठी 12 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. या कारची नोंदणी याच वर्षी जानेवारी महिन्यात करण्यात आली आहे. ही म्हणजे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांना साखरपुड्याची भेट म्हणून देण्यात आल्याचं सांगितलं जातं.

ताफ्यात या आलीशान कार

मुकेश अंबानी हे त्यांच्या आलीशान कार कलेक्शनसाठी ओळखले जातात. रोल्स-रॉयस फॅण्टम ड्रॉपहेड (7 कोटी 60 लाख), बेंटली बेंतायगा (3 कोटी 85 लाख), बीएमडब्ल्यू 760 एलआय आर्मर्ड (8 कोटी 50 लाख), मर्सिडीज मेबॅच बेन्झ एस 660 गार्ड (10 कोटी 50 लाख), फेरारी एसएफ 90 स्ट्रडेल (7 कोटी 50 लाख), बेंटली कॉण्टीनेंटल फ्लाय सर्प (3 कोटी 69 लाख), अॅस्टॉन मार्टीन रॅपीड (3 कोटी 88 लाख), रोल्स-रॉयस फॅण्टम (4 कोटी) अशा आलिशान गाड्या आहेत.