close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

Samsung चा Galaxy Note 10 येणार, पाहा फीचर्स आणि किंमत

सॅमसंगने त्यांच्या मेड इन इंडिया फ्लॅगशिप्स गॅलॅक्सी नोट १० (Galaxy Note 10) आणि नोट १० प्लस (Note 10+) बाजारात आणले आहेत. या दोन्ही स्मार्टफोनची किंमत जवळ-जवळ ६९ हजार ९९९ रुपये, आणि ७९ हजार ९९९ रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे.

Updated: Aug 19, 2019, 02:05 PM IST
Samsung चा Galaxy Note 10 येणार, पाहा फीचर्स आणि किंमत

मुंबई : सॅमसंगने प्रीमियम स्मार्टफोन सेग्मेंटमध्ये सर्वांनाच पुन्हा टक्कर देण्यास सुरूवात केली आहे. यात अॅपल, गूगल पिक्सल आणि हुआवेई डिव्हाइस यांचा समावेश आहे. आता सॅमसंगने त्यांच्या मेड इन इंडिया फ्लॅगशिप्स गॅलॅक्सी नोट १० (Galaxy Note 10) आणि नोट १० प्लस (Note 10+) बाजारात आणले आहेत. या दोन्ही स्मार्टफोनची किंमत जवळ-जवळ ६९ हजार ९९९ रुपये, आणि ७९ हजार ९९९ रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे.

गॅलेक्सी नोट १० प्री- बुकिंग सुरू
भारताच्या युझर्ससाठी गॅलेक्सी नोट १० ची प्री-बुकिंग आधीच सुरू झाली आहे आणि ही २२ ऑगस्टपर्यंत चालू असेल. जर तुम्ही फोनची प्री बुकींक केली आहे, तर हा फोन तुम्हाला २३ ऑगस्टला मिळेल. याच दिवशी या फोनला जगभरातील बाजारांमध्ये लॉन्च केले जाईल. तुम्ही गॅलेक्सी नोट स्मार्टफोनला सॅमसंग, फ्लिपकार्ट, पेटीएम आणि टाटा क्लिकच्या ऑनलाइन पोर्टलवर बुक करू शकतात.

२० ऑगस्ट ला लॉन्च केला जाईल
एंड्राइड ९ (पाई) ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या गॅलेक्सी नोट १० मध्ये ६.३ इंच चा एफएचडी प्लस स्क्रीन आहे आणि गॅलेक्सी नोट १० प्लस मध्ये ६.८ इंच चा क्कॅड एचडी स्क्रीन आहे. यांना भारतीय बाजारात अधिकृतपणे २० ऑगस्टला लॉन्च केले जाईल.

काउंटरपॉइंट रिसर्चचे असोसिएट निदेशक तरूण पाठक म्हणाले, सॅमसंग नेहमी नोट सीरीजमध्ये सगळ्यात चांगले स्पेसिफीकेशन्स देत आला आहे, यावर्षी देखील कंपनीने असेच केले आहे. नवीन नोट सीरीजने कंपनीला प्रीमियम फोनच्या बाजारात प्रवेश करण्यात मदत होणार आहे.