खूपच कमी किंमतीत Nokia 2.4 लॉंच, जाणून घ्या फिचर्स

नोकीया आपला नवा स्मार्टफोन Nokia 2.4 भारतीय बाजारात आणलायं.

Updated: Nov 27, 2020, 09:00 AM IST
खूपच कमी किंमतीत Nokia 2.4 लॉंच, जाणून घ्या फिचर्स

नवी दिल्ली : नोकीया आपला नवा स्मार्टफोन Nokia 2.4 भारतीय बाजारात आणलायं. एचएमडी ग्लोबल (HMD Global) ने २६ नोव्हेंबरला यासंदर्भात अधिकृत घोषणा केली. नवा Nokia 2.4 हा एक बजेट फोन आहे. याचे फिचर्स जाणून घ्या.

Nokia 2.4 ची किंमत 

नोकीया मोबाईल इंडीया (Nokia Mobile India) ने या नव्या डिव्हाईसची किंमत  (Nokia 2.4 Price in India) १० हजार ३९९ रुपये ठेवलीय. 

काय आहेत फिचर्स ?

ड्यूअल सिम (Nano)नोकीया २.४ एंड्रॉईड १० (Android 10) वर चालतो. यामध्ये २०.९ आस्पेक्ट रेशियो वाल्या ६.५ इंच एचडी प्लस (720x1,600 पिक्सल) डिस्प्ले आहे. या एस्पेक्ट रेशियो २० :९ आहे. फोनमध्ये पंच होलसहीत ८ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये बॅकला ट्रिपल रियर कॅमेरा आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा सेंसर १३ मेगापिक्सलचा आहे. 

याशिवाय दुसरा सेंसर ५ मेगापिक्सलचा आणि तिसरा सेंसर २ मेगापिक्सलचा आहे. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 460  प्रोसेसर आहे. फोनमध्ये 3/4GB रॅम आणि 32GB/64GB स्टोरेज ऑप्शन आहे. फोनमध्ये 4,000mAh बॅटरी आहे. ज्याला स्टॅंडर्ड १० वॉट चार्ज सपोर्ट आहे. 

Nokia 2.4 मध्ये MediaTek Helio P22 प्रोसेसर दिला गेलाय. फोनमध्ये बॅंक ड्यूअल कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा सेंसर १३ मेगापिक्सलचा आहे. फोनमध्ये 2/3GB रॅम आणि 32GB/64GB स्टोरेज ऑप्शन देण्यात आलंय.