१५ ऑगस्टपासून सुरू होणार नोकिया ५ ची ऑफलाईन विक्री

नोकियाच्या बहुप्रतिक्षीत नोकिया ५ या बजेट फोनची विक्री १५ ऑगस्टपासून रिटेल स्टोरमध्ये सुरू आहे. एक महिन्यांपासून या स्मार्टफोनची प्री-बुकींग सुरू होती. आता हा फोन रिटेल स्टोर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. नोकिया ५ भारतातील निवडक दहा शहरांमध्ये मंगळवारपासून विक्रीसाठी उपलब्ध असेल. 

Updated: Aug 14, 2017, 03:20 PM IST
१५ ऑगस्टपासून सुरू होणार नोकिया ५ ची ऑफलाईन विक्री title=

मुंबई : नोकियाच्या बहुप्रतिक्षीत नोकिया ५ या बजेट फोनची विक्री १५ ऑगस्टपासून रिटेल स्टोरमध्ये सुरू आहे. एक महिन्यांपासून या स्मार्टफोनची प्री-बुकींग सुरू होती. आता हा फोन रिटेल स्टोर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. नोकिया ५ भारतातील निवडक दहा शहरांमध्ये मंगळवारपासून विक्रीसाठी उपलब्ध असेल. 

या शहरांमध्ये मुंबई, पुणे, बंगळुरु, दिल्ली एनसीआर, चेन्नई, चंदीगड, जयपूर, कोलकता, लखनौ, इंदूर, हैदराबाद, अहमदाबाद और कालीकत या शहरांचा समावेश आहे. नोकिया 6 हा स्मार्टफोन अमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. नोकिया ५ हा फोन गेल्या महिन्यात १२ हजार ८९९ रुपयात लाँच करण्यात आला होता. यासोबतच नोकिया ६ आणि नोकिया ३ हे फोनही लाँच करण्यात आले होते.

नोकिया ५ १२ हजार ८९९ रुपयांमध्ये उपलब्ध असेल. हा फोन खरेदी करताना व्होडाफोन ग्राहकांना १४९ रुपयांमध्ये ५ GB डेटा मिळेल. तीन महिन्यांसाठी ही ऑफर सुरु राहिल. ग्राहकांना २५०० रुपयांचं makemytrip.com चं कूपन मिळेल. यामध्ये हॉटेल बुकिंगवर १८०० रुपयांची आणि विमान तिकिटावर ७०० रुपयांपर्यंत सूट मिळेल.

नोकिया ५ स्मार्टफोनचे फीचर्स :

५.२ इंच आकाराची स्क्रीन
फिंगरप्रिंट सेन्सर 
होम बटन
१३ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
3000mAh क्षमतेची बॅटरी
ऑक्टा कोअर प्रोसेसर
२GB रॅम
१६ GB इंटर्नल स्टोरेज