NOKIAचा दमदार Smartphone लॉन्च, 72 तासांचा तगडा बॅटरी बॅकअप, किंमत फक्त...

तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी गूड न्युज आहे. 

Updated: Jul 29, 2021, 06:39 PM IST
NOKIAचा दमदार Smartphone लॉन्च, 72 तासांचा तगडा बॅटरी बॅकअप, किंमत फक्त...

मुंबई : तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी गूड न्यूज आहे. एचएमडी ग्लोबलने 3 नवे स्मार्टफोन आणि एक नवा ऑडीयो पोर्टफोलियो लॉन्च केला आहे. कंपनीने नोकियो एक्सआर 20 (Nokia XR 20) , नोकिया 6310 (Nokia 6310) आणि नोकिया सी 30 (Nokia C30) हे तीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. या तिघांपैकी नोकिया सी30 हा सर्वात धमाकेदार मोबाईल समजला जात आहे. Nokia C30 मध्ये  दमदार बॅटरी बॅकअप आणि मोठी स्क्रीन आहे. या स्मार्टफोनचा लूकही शानदार आहे. हा मोबाईल एकदा चार्जिंग केल्यास 3 दिवस चालेल, असा कंपनीचा दावा आहे. या नोकिया सी 30 ची किंमत आणि फीचर्स किती आहे, हे जाणून घेऊयात. 
(nokia c30 smartphone launch in india  know price and specification)

Nokia C30 चे फीचर्स

Nokia C30चा डिस्प्ले हा 6.82 इंच एचडी प्लस आहे. या स्मार्टफोनचे एकूण 3 व्हेरीएंट आहेत. यापैकी 2 मोबाईलची इंटरनल स्टोरेज 32 जीबी इतकी आहे. स्टोरेज लिमीट 256जीबी पर्यंत वाढवता येईल. हा मोबाईल Android 11 या ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित आहे. विशेष म्हणजे यामध्ये  रियर फिंगरप्रिंट सेंसरही देण्यात आला आहे. या स्मार्टफोनला तगडा बॅटरीबॅकअप देण्यात आलाय.  या स्मार्टफोनची बॅटरी ही 6000mAH इतकी आहे.स्मार्टफोन ग्रीन आणि व्हाईट रंगात उपलब्ध आहे. 

कॅमेरा आणि किंमत

मोबाईलचा रियर प्रायमरी कॅमेरा हा 13 तर सेंकड कॅमेरा 2 मेगापिक्सलचा आहे. तसेच सेल्फी कॅमेरा हा 5 मेगापिक्सल इतका आहे. या स्मार्टफोनची किंमत केवळ 8 हजार 700 रुपये इतके आहे.