मुंबई : स्मार्टफोनच्या बाजारपेठेत HMD Global चा ताबा नोकिया सारख्या कंपनीकडे आहे. मात्र असं असताना नोकिया फोनचं मार्केट मात्र घटत असल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरी कंपनी नवनवीन फोन्स आणि गॅजेट्सच्या निमित्ताने चर्चेमध्ये असतेच. अशातच, नोकिया कंपनीने चीनमध्ये एक नवीन Nokia T20 नावाचा
टॅबलेट लाँच केला आहे.
आपल्याला आठवतं असेल की 2021 च्या डिसेंबर महिन्यात Nokia T20 Education Edition या टॅबलेटचं गुपित उघड केलं होत. यापूर्वी लाँच केलेल्या टॅबलेटच्या डिझाइन आणि स्पेसिफिकेशनपेक्षा हा टॅबलेट अधिक आकर्षक आहे. या टॅबमध्ये तडफदार बॅटरी आणि प्रोसेसर दिलं गेलं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे या टॅबलेटची बॅटरी ही एका पावरहाऊपेक्षा कमी नाहीये.
या टॅबच्या फीचर्सबद्दल सांगायचं झालं तर Nokia T20 ऑक्टा-कोर यूनिसोक T610 चिप पेक्षा कमी आहे जो अँड्रॉइड 11 OS वर काम करतो. Nokia T20 मध्ये 2000×1200 पीक्सल रेजोल्यूश असणारा 10.4 इंच चा डिस्प्ले स्क्रीन आहे. टॅबलेटमध्ये ब्राइटनेस बूस्ट, SGS लो ब्लू लाइट सर्टिफिकेशन आणि 400 निट्स ब्राइटनेस उपलब्ध आहे.
त्याचबरोबर, Nokia T20 मध्ये मागच्या बाजूला 8MP सेन्सर आणि 5MP फ्रंट शूटर आहे. हा टॅब दोन स्टोरेज प्रकारांमध्ये येतो एक म्हणजे 32GB आणि दुसरा 64GB, तर 512GB पर्यंत microSD कार्डला सपोर्ट करतो. तसेच, टॅबलेट 3GB आणि 4GB रॅम पर्यायांसह येतो.
या टॅबमध्ये Nokia T20 Unisoc T610 चिप असून तो Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. टॅबलेटमध्ये 15W चा चार्जर आणि 8200mAh ची बॅटरी मिळते. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये ड्युअल-बँड वाय-फाय, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक उपलब्घ आहे. हा टॅब धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP52 रेटिंगसह येतो.
32GB आणि 64GB या दोन स्टोरेज प्रकारांमध्ये उपलब्ध असणाऱ्या Nokia T20 टॅबलेटची किंमत 1,299 युआन (अंदाजे रु. 15,415) इतकी आहे आणि तो ओशन ब्लू कलरमध्ये उपलब्ध आहे. तसेच, हा टॅबलेट चीनमध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे.