फक्त 5 हजारात Nokia चा डुअल स्क्रीन फोन; पूर्ण चार्जनंतर चालणार तब्बल 20 दिवस

नोकियाने 5000 रुपये किमतीचा दोन स्क्रीनचा नोकिया 2660 फ्लिप फोन लॉन्च केला आहे. Nokia 2660 Flip चे डिझाईन देखील आकर्षक आहे. जाणून घेऊ Nokia 2660 Flip ची किंमत आणि फीचर्स...

Updated: Jul 13, 2022, 07:50 AM IST
फक्त 5 हजारात Nokia चा डुअल स्क्रीन फोन; पूर्ण चार्जनंतर चालणार तब्बल 20 दिवस   title=

मुंबई : नोकियाने तीन उत्कृष्ट फीचर फोन बाजारात आणले आहेत. जे स्टायलिश डिझाइनसह येतात. फोन जुन्या फोनप्रमाणेच उत्कृष्ट डिझाइनसह बाजारात येणार आहेत. कंपनीने १२ जुलै रोजी Nokia 2660 Flip, Nokia 8210 4G आणि Nokia 5710 XpressAudio लॉन्च केले आहेत.

आज आम्ही तुम्हाला Nokia 2660 Flip बद्दल सांगणार आहोत, जे फोन डुअल स्क्रीन सह येतात. यात दीर्घ काळ चालणारी बॅटरी देखील आहे. लोकांना Nokia 2660 Flip चे डिझाईन देखील आवडले आहे. चला जाणून घेऊ Nokia 2660 Flip ची किंमत आणि फीचर्स...

Nokia 2660 Flip Specifications

नोकिया 2660 फ्लिप, एक फ्लिप फोन आहे. यात आयकॉनिक क्लॅमशेलसारखे डिझाइन आहे आणि ते ड्युअल-सिम सपोर्टसह येते. हँडसेटमध्ये दोन डिस्प्ले आहेत. यात आतील बाजूस 2.8-इंचाचा QVGA डिस्प्ले आणि मागील बाजूस 1.77-इंचाचा QQVGA डिस्प्ले आहे.

Nokia 2660 Flip Storage

फोन Unisoc T107 प्रोसेसरचा सपोर्ट आहे आणि त्यात 128MB इनबिल्ट स्टोरेज आहे. जे मायक्रोएसडी कार्डने 32GB पर्यंत स्टोरेज वाढवता येते.

Nokia 2660 Flip Battery

डिव्हाइसची बॅटरी 1,450mAh इतकी असून, जी स्टँडबायवर 20 दिवस टिकते. तसेच, यात एफएम रेडिओ इयरफोन प्लग न करता सुरू होऊ शकतो. फोनमध्ये MP3 प्लेयर आणि VGA कॅमेरा देखील आहे.

Nokia 2660 Flip Price

फोनच्या विक्रीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. नोकिया 2660 फ्लिप $ 59 (4,689 रुपये) मध्ये उपलब्ध असेल. कंपनीने Nokia 8210 4G आणि Nokia 5710 XpressAudio देखील लॉन्च केले आहे, ज्याची किंमत अनुक्रमे $59 आणि $69 असेल.