तुंबाडचा दिग्दर्शक राही अनिल बर्वेची सिक्वेलमधून एक्झिट, सोहम शाह म्हणाला, 'तुला....'

तुंबाडचा (Tumbbad) दिग्दर्शक राही अनिल बर्वे (Rahi Anil Barve) यांनी चित्रपटाच्या सिक्वेलमधून माघार घेतली आहे. सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून त्यांनी याची घोषणा केली आहे.   

शिवराज यादव | Updated: Sep 22, 2024, 12:12 PM IST
तुंबाडचा दिग्दर्शक राही अनिल बर्वेची सिक्वेलमधून एक्झिट, सोहम शाह म्हणाला, 'तुला....' title=

तुंबाड चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला असून, चित्रपटाच्या शेवटी सिक्वेलची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान तुंबाडचा (Tumbbad) दिग्दर्शक राही अनिल बर्वे (Rahi Anil Barve) यांनी चित्रपटाच्या सिक्वेलमधून माघार घेतली आहे. यानंतर निर्माता-अभिनेता सोहम शाह आणि सह-दिग्दर्शक आदेश प्रसाद यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.  

राही अनिल बर्वे यांनी काय म्हटलं आहे?

राही अनिल बर्वे यांनी शनिवारी संध्याकाळी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितलं की, "अनेक दशकांपासून, मी अनेक निर्मात्यांसोबत वेड्या मालिकांवर काम केले आहे. प्रथम पितृसत्ताचा (तुंबड) लोभ होता. वडील, मुलगा आणि पवित्र भूत यांची माझी वैयक्तिक आणि अधिक गडद आवृत्ती. दुसऱ्यात पहाडपांगिरामध्ये स्त्रीवादाची पहाट आहे, या मालिकेचा शेवट पक्षीतीर्थने होईल. मला सध्या एवढेच सांगायचं आहे".

"मी सोहम आणि आदेशला तुंबाड 2 साठी शुभेच्छा देतो. त्यांना फार यश मिळेल यात मला शंका नाही. गुलकंदा टेल्स आणि रक्तब्रम्हांड या वर्षाच्या अखेरीस पूर्ण झाल्यानंतर, मार्च 2025 मध्ये पहाडपांगिरावर काम सुरू करण्याची माझी योजना आहे," अशी माहिती त्यांनी दिली आहे. 

सोहम आणि आदेश झाले व्यक्त

सोहमने राही बर्वेंच्या पोस्टवर कमेंट करत पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. "गुलकंद आणि रक्तब्रह्मांडसाठी अभिनंदन माझ्या मित्रा. पहाडपांगिराही लवकर सुरु कर. फार मजा येईल," असं त्याने म्हटलं आहे. राही यांनी यावर सोहमचे आभार मानत म्हटलं आहे की, "मी नेहमीच तुझ्यासाठी उपलब्ध आहे. सर्व गोष्टींसाठी आभार". 

आदेशने राहीच्या पोस्टवर कमेंट करत म्हटलं आहे की, "धन्यवाद राही. मी नेहमीच तुझ्यासाठी चिअर करत असतो हे काही लपून राहिलेलं नाही. तुझी सर्व स्वप्नं अखेरीस पूर्ण होताना पाहून माझे हृदय खूप प्रेम, अभिमान आणि उत्साहाने भरले आहे. हे सर्व तू खूप कष्टाने कमावलं असून त्यासाठी पात्र आहेस".

तुंबाडच्या पहिल्या भागाचे क्रिएटिव्ह डायरेक्टर आनंद गांधी यांनी देखील एक्सवरुन आपण तुंबड 2 चा भाग नस्लयाचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, राहीने याआधीच आगामी हॉरर कॉमेडी मालिका गुलकंदा टेल्स आणि रक्तब्रह्मांडचं लेखन पूर्ण केलं आहे. राज आणि डीके याची निर्मिती करत आहेत. तुंबाडने पुन्हा एकदा रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर 13.44 कोटींची कमाई केली आहे. 2018 मध्ये रिलीज झाल्यानंतर केलेल्या कमाईला चित्रपटाने मागे टाकलं आहे.