मुंबई : 'व्हॉट्सअॅप हे इन्स्टंट मेसेजिंग अॅप जगभरात लोकप्रिय आहे. जगाच्या काना कोपर्यात राहणार्या मंडळींशी कनेक्टेड ठेवताना अनेकजण व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून फोटो, व्हिडिओ,ऑडिओ क्लिप्स शेअर करतत. मात्र एखदा डिलिट झालेला हा मीडिया पुन्हा मिळवता येत नाही. पण आता व्हॉट्सअॅपच्या युजर्सना त्यांनी गमावलेला मीडिया पुन्हा मिळवणं शक्य होणार आहे.
व्हॉट्सअॅपमधील नव्या अपडेटनुसार आता युजर्सना त्यांचा डिलिट झालेला डाटा पुन्हा मिळवता येणार आहे. पूर्वी व्हॉट्सअॅपवर 30 दिवसांसाठी व्हिडिओ, फोटो, डॉक्युमेंट्स यासारखा मीडिया स्टोर केला जात होता. मात्र काही दिवसांपूर्वी ते बंद करण्यात आले होते. आता कंपनीने पुन्हा सर्व्हरवर डाटा स्टोअर करायला सुरूवात केली आहे.
आता पुन्हा व्हॉट्सअॅपवर मीडिया फाईल डाऊनलोड करण्याची सोय देण्यात आली आहे. डिलिट केलेला मेसेज पुन्हा मिळवता येणार नाही.
व्हॉट्स अॅपच्या 2.18.113 यामध्ये हे अपडेट देण्यात आलं आहे. तुम्हांला डिलिट केलेले फोटो, व्हिडिओ, ऑडिओ फाईल्स पुन्हा डाऊनलोड करायचे असतील तर त्या चॅटमध्ये जा. युजर्सच्या नावावर क्लिक करा. त्यानंतर Media वर क्लिक करा. त्यानंतर ज्या फाईलला डाऊनलोड करायचं आहे त्यावर क्लिक करा. या द्वारा तुम्ही 2 महिने जुना डिलिट केलेला डाटादेखील पुन्हा डाऊनलोड करू शकता.