मुंबई : फेसबुकवर अनेकदा युझर्स आपली अगदी छोट्यातील छोटी गोष्ट शेअर करत असतो. यानंतर अनेक युझर्स अकाऊंट हॅक होण्याची तक्रार करतात. त्यामुळे आता फेसबुक डाटा लीक होण्याची शक्यता अधिक वाढली आहे. अनेक लोक फेसबुकबाबत चिंतेत आहेत. कित्येक जणांनी आपलं जुनं असलेलं फेसबुक अकाऊंट डिलीट करत आहेत. अजूनही तुम्ही तुमच्या फेसबुक अकाऊंटला सुरक्षित ठेवण्याची इच्छा करत असाल तर या 9 गोष्टी लगेच डिलीट केला.
अनेकजण फेसबुकवर आपल्या वाढदिवसाची तारीख लिहितात. पण तुम्हाला हे लक्षात असायला हवं की तुमची जन्मतारीख ही अनेक महत्वाच्या कागदपत्रांवर देखील असते. याच्या माध्यमातून लोकं तुमच्या बँक अकाऊंट आणि पर्सनल डिटेल्स सारख्या गोष्टी वापरू शकतात.
फेसबुकवर देखील आपला नंबर शेअर करणं चुकीचं आहे. यासोबतच पर्सनल डिटेल्स एक्सेस केलं जाऊ शकतं. कारण तुमचा मोबाईल नंबर महत्वाच्या कागदपत्रांवर असून त्याचा गैरवापर होऊ शकतो.
फेसबुकवर कोणत्याही अनोळखी व्यक्तीला फ्रेंड बनवण्यापूर्वी खूप विचार करायला हवं. गरजेचं नाही की पाठवलेल्या प्रत्येक फ्रेंड रिक्वेस्ट अॅक्सेप्ट केल्या पाहिजेत. त्यामधील अनेक लोकं फ्रॉड देखील असू शकतात. त्यामुळे कुणाला ही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवताना किंवा अॅक्सेप्ट करताना विचार करा.
फेसबुकवर लहान मुलं किंवा कुटुंबातील व्यक्तींचे फोटो शेअर करताना विचार करा. आणि या अगोदर पासून असेल तर ते फोटो काढून टाका. कारण या फोटोंच्या माध्यमातून तुमचं संपूर्ण कुटूंब कळतं. आणि याचा गैरवापर होऊ शकतो.
त्याचप्रमाणे अनेक फेसबुक युझर्स फोटोसोबत आपलं लोकेशन देखील टाकतात. त्यामुळे तुम्ही कुठे राहता तसेच कुठे आणि किती दिवस फिरायला गेलात याची माहिती सगळ्यांना कळतं. असं केल्यामुळे तुमच्या घराचा पत्ता फेक लोकांना देखील कळतो.
तसेच सगळ्यात महत्वाचं म्हणजे फेसबुक युझर्स फिरायला गेल्यावर प्रत्येक अॅक्टिव्हिटी पोस्ट करत असतात तेव्हा त्याचा त्याचा परिणाम होऊ शकतो. अनेकदा आपण या अॅक्टिव्हिटी करताना याचा फटका तुम्हाला बसू शकतो. या सवयीला आता इंश्युरन्स कंपनी देखील खूप गंभीरपणे घेत आहे. त्यामुळे असं काही करताना विचार करा अन्यथा तुमचं इंश्युरन्स रद्द होऊ शकतं.
तसेच रिलेशनशीप अपडेट करताना विचार करा. कारण सिंगल किंवा मॅरीड असं स्टेटस ठेवण तुम्हाला त्रास देऊ शकतं.
फेसबुकवर कधीच बोर्डिंग पासचा फोटो शेअर करू नका. त्यावर असलेला बार कोड हा सगळ्यांना कळतो आणि याच्या माध्यमातून फेक युझर्स एअरलाइन्स कंपनीच्या माध्यमातून तुमची सर्व माहिती मिळवू शकता.
कोणत्याही पद्धतीच्या क्रेडिट किंवा डेबीट कार्डची माहिती फेसबुकवर शेअर करू नका. परदेशात असे डिटेल्स शेअर केल्यामुळे अडचणी वाढल्यामुळे अनेक संकटांना सामोरं जावं लागलं आहे.