close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

प्रसिद्धिसाठी काहीही! कॅमेऱ्यासमोर जिवंत ऑक्टोपस खाण्याचा प्रयत्न, पण...

तिनं जिवंत ऑक्टोपस खाण्याचा प्रयत्न केला. परंतु, थोड्याच वेळात ही 'मजा' तिच्यासाठी 'सजा' बनली... 

Updated: May 9, 2019, 10:14 AM IST
प्रसिद्धिसाठी काहीही! कॅमेऱ्यासमोर जिवंत ऑक्टोपस खाण्याचा प्रयत्न, पण...

मुंबई : काही क्षणांत प्रसिद्ध होण्यासाठी कोण काय करील हे काही सांगता येत नाही... इंटरनेटच्या जमान्यात तर हे आता आणखीनच सोप्पं झालंय. ब्लॉग्स लिहून किंवा एखाद्या व्हिडिओच्या साहाय्यानं निर्माते नेहमीच काहीतरी नवीन आणि वेगळं करण्याचा प्रयत्न करताना सर्रास दिसतात. पण, या प्रयत्नात काहीतरी वेगळंच हाती लागलं तर... असंच काहीसं या मुलीसोबतही घडलंय. प्रसिद्धीच्या नादात या मुलीनं आपला जीवही धोक्यात घातला. 

या तरुणीनं लाईव्ह स्ट्रीमिंग व्हिडिओ दरम्यान जिवंत ऑक्टोपस खाण्याचा प्रयत्न केला. परंतु, थोड्याच वेळात ही 'मजा' तिच्यासाठी 'सजा' बनली. कारण, तिनं ऑक्टोपसला खाण्याअगोदर ऑक्टोपसनंच तिच्यावर हल्ला केला. गंमत म्हणजे, या हल्ल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 

या व्हिडिओमध्ये ब्लॉगर ऑक्टोपस तोंडात टाकून खाण्याचा प्रयत्न करताना दिसतेय. परंतु, आठ हात-पायांचा हा प्राणी तिच्या तोंडावर आपली पकड घट्ट करतो. तिचे ओठ-गाल-डोळ्यांखालचा भाग ऑक्टोपसच्या तावडीत सापडतो... किंचाळत असतानाच खूप प्रयत्न करून ती तरुणी ऑक्टोपसला आपल्यापासून वेगळं करते. 

परंतु, ऑक्टोपसनं तिच्या चेहऱ्यावरच्या घट्ट पकडीमुळे तिच्या गालांतून रक्तही येऊ लागलेलं या व्हिडिओत दिसतंय.