मुंबई : दक्षिण कोरियाची कंपनी एलजीने बुधवारी आपला एलजी क्यू7 आणि एलजी क्यू7+ स्मार्टफोनची आधिकृत किंमत जाहीर केली आहे. मागच्या महिन्यात हे 2 फोन लॉन्च करण्यात आले. ऑरोरा ब्लॅक आणि लेवेंडर वॉयलेट रंगामध्ये हे फोन उपलब्ध असतील. LG Q7ची किंमत 495,000 कोरियाई वॉन म्हणजे जवळपास 30,900 रुपये आणि LG Q7+ची किंमत 570,000 कोरियाई वॉन म्हणजेच जवळपास 35,600 रुपये असेल.
हा फोन सध्या दक्षिण कोरियच्या मार्केटमध्ये उपलब्ध झाला आहे. लवकरच हा स्मार्टफोन भारतात लॉन्च केला जाईल. एलजी क्यू6 आणि एलजी क्यू6 प्लस भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आले होते. LG Q7a म्हणजेच LG G7 Alpha ची किंमतीबाबत अजून खुलासा झालेला नाही.
LG Q7 आणि Q7+ आउट ऑफ बॉक्स अँड्रॉयड 8.0 ओरियोवर चालतो. यामध्ये 5.5 इंचाची फुल-एचडी+ (1080x2160 पिक्सल) फुलव्हिझन डिस्प्ले आहे. आस्पेक्ट रेशो 18:9 आणि पिक्सल डेनसिटी 442 पिक्सल प्रति इंच आहे. यामध्ये ऑक्टा-कोर चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. चिपसेटसोबतच एलजी क्यू7 मध्ये 3 जीबी रॅम देण्यात आला आहे. एलजी क्यू7 प्लसमध्ये 4 जीबी रॅम असणार आहे. LG Q7 मध्ये 13 मेगापिक्सल रेअर कॅमेरा देण्यात आला आहे. क्यू7 प्लसमध्ये 16 मेगापिक्सलचं सेंसर देण्यात आलं आहे. LG Q7 आणि Q7+ च्या फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलचं सेंसर असणार आहे. वाइड अँगल लेंसा 5 मेगापिक्सलचा सेंसर आहे.