जबरदस्त Offer: OPPO चा 14 हजारांचा स्मार्टफोन अवघ्या 590 रुपयात! आजच संधीचं सोनं करा

ओप्पोचा जबरदस्त फिचर्स असलेला स्मार्टफोन अवघ्या 590 रुपयात मिळत आहे.

Updated: Jul 25, 2022, 04:08 PM IST
जबरदस्त Offer: OPPO चा 14 हजारांचा स्मार्टफोन अवघ्या 590 रुपयात! आजच संधीचं सोनं करा title=

Amazon Sale Offer: अ‍ॅमेझॉनवर रोज काही ना काही ऑफर असतात. स्मार्टफोनवरील ऑफरची तर मोबाईलप्रेमी उत्सुकतेने वाट पाहात असतात. कारण महागडे स्मार्टफोन स्वस्तात मिळतात. आताही अ‍ॅमेझॉनवर स्मार्टफोन आकर्षक ऑफर आली आहे. ओप्पोचा जबरदस्त फिचर्स असलेला स्मार्टफोन अवघ्या 590 रुपयात मिळत आहे. 14 हजार रुपयांच्या स्मार्टफोन जबरदस्त डिस्काउंट दिलं जात आहे. चला तर मग जाणून घेऊयात Oppo A15s या स्मार्टफोनवरील ऑफर्स आणि डिस्काउंट

Oppo A15s (4GB RAM+64 GB Storage) या स्मार्टफोनची लाँचिंग किंम 13,999 रुपये आहे. मात्र अ‍ॅमेझॉनवर 9,990 रुपयांना मिळत आहे. फोनवर 4 हजार रुपयांचा डिस्काउंड आहे. या व्यतिरिक्त फोन एक्सचेंज ऑफर देखील आहे. त्यामुळे या फोनची किंमत आणखी कमी होते.  एक्सचेंज ऑफमध्ये 9400 रुपयांची सूट मिळते. त्यामुळे या फोनची किंमत 9990 रुपये वजा 9400 रुपये केल्यास 590 रुपये इतकी राहते. 

Oppo A15s मध्ये 6.52 इंचाच एचडी + डिस्प्ले आहे आणि सेल्फी कॅमेऱ्यासाठी नॉच आहे. यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असून 13MP प्रायमरी कॅमेरा, 2MP मायक्रो कॅमेरा आमि 2MP डेप्थ सेंसरचा समावेश आहे. फ्रंटमध्ये व्हिडीओ आणि सेल्फीसाठी 8 MP कॅमेरा आहे. यात वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि रियर माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलियो P35 SoC ला 4GB रॅमसह 64GB स्टोरेजसह येतो. हा स्मार्टफोन अँड्रॉईड 10 वर आधारित ColorOS 7.2 आउट ऑ द बॉक्स आहे.