'ही' कंपनी घेऊन येतेय सर्वांत स्वस्त Smartphone!

10 हजारांहून कमी किंमतीत स्मार्टफोन, 'या' तारखेला खरेदी करता येणार  

Updated: Jul 25, 2022, 04:54 PM IST
'ही' कंपनी घेऊन येतेय सर्वांत स्वस्त Smartphone! title=

मुंबई : देशभरात दररोज नवनवीन स्मार्टफोन लॉंच होत असतात. आता पुन्हा एकदा एक स्मार्टफोन बाजारात लॉंच होणार आहे. या स्मार्टफोनची किंमत 10 हजाराहून कमी असणार आहे. त्यामुळे कमी बजेट असलेल्या खरेदीदारांना हा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. त्यामुळे या स्मार्टफोनची लॉचिंगची तारीख आणि फिचर्स जाणून घेऊयात.  

लाँचची तारीख
चीनी स्मार्टफोन विवो कंपनी येत्या काही दिवसात एक नवीन स्मार्टफोन Vivo Y02s लॉन्च करणार आहे.  येत्या काही दिवसांत म्हणजे 28 जुलै रोजी हा स्मार्टफोन बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. या तारखेला हा फोन जागतिक स्तरावर लॉन्च केला जाईल, म्हणजेच भारतातही त्याची विक्री होण्याची शक्यता आहे.

किंमत किती?
Vivo Y02s या Vivo स्मार्टफोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची किंमत खूपच कमी आहे आणि खऱ्या अर्थाने हा एक बजेट स्मार्टफोन आहे. 3GB रॅम आणि 32GB स्टोरेजसह या स्मार्टफोनचा सिंगल व्हेरिएंट $113 (सुमारे 9 हजार रुपये) च्या किमतीत खरेदी केला जाऊ शकतो. याबाबत अद्याप तरी अधिकृतपणे कोणतीही माहिती आलेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार तो 9 हजाराला खऱेदी करता येणार आहे. 

फिचर्स 
मीडिया रिपोर्ट्नुसार, तुम्हाला Vivo Y02s मध्ये 6.51-इंचाचा HD+ रिझोल्यूशन डिस्प्ले आणि 60Hz रिफ्रेश रेट मिळू शकतो. हा फोन Mediatek Helio P35 SoC प्रोसेसरवर काम करू शकतो आणि यामध्ये तुम्हाला LED फ्लॅशसह 8MP प्राथमिक कॅमेरा मिळेल.

Vivo Y02s 5MP फ्रंट कॅमेरासह येऊ शकतो आणि तुम्हाला 10W चार्जिंग सपोर्ट आणि 5W रिव्हर्स चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी दिली जाऊ शकते. ऑपरेटिंग सिस्टम बद्दल बोलायचे झाले तर Vivo Y02s Android 12 वर चालु शकतो.