अशाप्रकारे मोबाईल फोटोग्राफीतून कमवा पैसे!

ही स्मार्टफोनची दुनिया आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. 

Updated: May 2, 2018, 08:29 AM IST
अशाप्रकारे मोबाईल फोटोग्राफीतून कमवा पैसे! title=

मुंबई : आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. ही स्मार्टफोनची दुनिया आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यात भर म्हणजे आता नवनवे स्मार्टफोन्स जबरदस्त कॅमेऱ्यासहीत लॉन्च होत आहेत. काही नवे स्मार्टफोन बाजारात लॉन्च झाले आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही उत्तम फोटोग्राफी करु शकता आणि त्या फोटोज मधून पैसेही कमवू शकता. एका फोटोसाठी तुम्हाला कमीत कमी २० रुपये मिळू शकतील. पण कसे? तर त्याचे अनेक पर्याय आहेत. या जाणून घेऊया....

123RF

फोटोतून ऑनलाईन पैसे कमवू इच्छिता तर 123RF वर अकाऊंट बनवा आणि त्यावर  फोटो अपलोड करा. ही वेबसाईट तुमच्या फोटोतून झालेल्या कमाईतील  60% हिस्सा तुम्हाला देईल.

Alamy 

ही वेबसाईट प्रत्येक फोटोच्या बदल्यात 50% हिस्सा तुम्हाला देईल. मात्र हे पैसे तेव्हाच मिळतील जेव्हा कोणीतरी तुमचा फोटो डाऊनलोड करेल.

Animals Animals 

तुम्हाला प्राण्यांचे फोटोज काढायची आवड असेल तर या वेबसाईटवरून तुम्ही तुमच्या फोटोच्या कमाईतील 50% हिस्सा प्राप्त करु शकता.

CrowdFoto 

ही वेबसाईट तुम्हाला एक असाईनमेंट देईल. त्यावरून तुम्हाला फोटोग्राफी करुन फोटो अपलोड करावा लागेल. जर तुम्ही अपलोड केलेला फोटो कोणी खरेदी केला तर तुम्हाला PayPal च्या माध्यमातून 1,600 रुपये मिळतील. सध्या फोटो अपलोड करण्याची सुविधा स्थगित करण्यात आली आहे. मात्र लवकरच ती सुरु करण्यात येईल.

StockFood 

फूड फोटोग्राफीची आवड असल्यास ही वेबसाईट तुमचे स्वागत करत आहे. या वेबसाईटवर फूड फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करु शकता.