या वेबसाईटवर आयफोन फक्त ५,९९० रुपयांना उपलब्ध !

ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट ची बंपर ऑफर्स चालू असतानाच पेटीएमने त्यांच्या डिस्कॉऊंट ऑफरची घोषणा केली. ही ऑफर पण इतर वेबसाईटने दिलेल्या ऑफर्स इतकी आकर्षक आहे. अशी महासेल ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट पेटीएमतर्फे सुरु करण्यात आली आहे. या सेलमध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्सबरोबरच आयफोन देखील अगदी माफक किंमतीत उपलब्ध आहे. ऑफर असल्यामुळे पेटीएम मॉल अॅपवर 'आयफोन एस ई' केवळ ५,९९० रुपयांना मिळत आहे. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Aug 9, 2017, 05:01 PM IST
या वेबसाईटवर आयफोन फक्त ५,९९० रुपयांना उपलब्ध ! title=
पेटीएम कडून बायबॅक गॅरेंटी देखील दिली जात आहे.

नवी दिल्ली: ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट ची बंपर ऑफर्स चालू असतानाच पेटीएमने त्यांच्या डिस्कॉऊंट ऑफरची घोषणा केली. ही ऑफर पण इतर वेबसाईटने दिलेल्या ऑफर्स इतकी आकर्षक आहे. अशी महासेल ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट पेटीएमतर्फे सुरु करण्यात आली आहे. या सेलमध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्सबरोबरच आयफोन देखील अगदी माफक किंमतीत उपलब्ध आहे. ऑफर असल्यामुळे पेटीएम मॉल अॅपवर 'आयफोन एस ई' केवळ ५,९९० रुपयांना मिळत आहे. 
वेबसाईटवर आयफोन एसई (iPhone SE) च्या ३२ जीबी व्हेरिएन्टची किंमत २२,९९० रुपये आहे. परंतु, पेटीएमवरून खरेदी केल्यास वेबसाईटकडून यावर तीन हजार रुपये कॅशबॅक दिली जाईल. त्यानंतर ग्राहकाला २ हजार रुपयांचे फ्लाईट व्हाऊचर आणि २ हजार रुपयांचे फॅशन शॉपिंग व्हाऊचर त्याचबरोबर १ हजार रुपयांचे मोबाईल ऍक्सेसरीज व्हाऊचर दिले जाईल. या सगळ्यामुळे आयफोन एसईची किंमत १४,९९० रुपये इतकी होते. परंतु, वेबसाईटकडून मिळणारी ऑफर इथेच संपत नाही. 
पेटीएम कडून फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकाला स्मार्टफोनवर ९००० रुपयांची बायबॅक गॅरेंटी देखील दिली जात आहे. म्हणजे जर ग्राहकाने काही काळाने आयफोन एसई पुन्हा पेटीएमला विकला तर कमीत कमी याची किंमत ९००० रुपये इतकी मिळेल. याचा अर्थ तुम्हाला आयफोन एसईची नेट किंमत ५,९९० रुपये इतकी पडेल. 
या फोनचे फीचर्स काय आहेत?
अँपल आयफोन एसई मध्ये ४ इंचाची स्क्रीन आहे. १२ मेगापिक्सलचा कॅमेरा देखील आहे. त्याचबरोबर फोन ए9 चिपवर काम करतो. मोबाईल युजर्स ४के रिजोल्यूशनने व्हिडीओ देखील रेकॉर्ड करू शकतील. आयफोन एसई मध्ये 1624mAh ची बॅटरी आहे.