रेल्वेत नोकरीची संधी, 4 हजारपेक्षा जास्त पदांच्या भरतीसाठी अर्ज करा

साऊथ सेंट्रल रेल्वे (South Central Railway 'SCR') प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती सुरू केली आहे.

Updated: Nov 17, 2019, 01:37 PM IST
रेल्वेत नोकरीची संधी, 4 हजारपेक्षा जास्त पदांच्या भरतीसाठी अर्ज करा title=

मुंबई : साऊथ सेंट्रल रेल्वे (South Central Railway 'SCR') प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती सुरू केली आहे. ज्या उमेदवारांना येथे अर्ज करायचा आहे, त्यांना साऊथ सेंट्रल रेल्वेच्या या वेबसाईटवर scr.indianrailways.gov.in.माहिती घेता येईल. या पदांविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती मिळू शकते. या पदांना अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 8 डिसेंबर 2019 आहे. साऊथ सेंट्रल रेल्वे एकूण 4 हजार 103 पदांची भरती करणार आहे. साऊथ सेन्ट्रल रेल्वे आपल्या आवश्यकतेनुसार पदांमध्ये वाढ किंवा आकडा कमी करू शकते.

योग्यता
अर्ज करण्यासाठी कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड परीक्षेत कमीत कमी दहावी पास. ज्या पदासाठी अर्ज करत आहात त्यासाठी त्या ट्रेडनुसार आयटीआयचं सर्टिफिकेट आणि तसेच त्यात 50 टक्के गुण असले पाहिजेत.

वयाची अट
अर्ज करताना तुमचं वय, कमीतकमी 15 वर्ष आणि जास्तच जास्त 24 वर्ष असलं पाहिजे.
 
परीक्षा फी
अर्ज करण्याआधी 100 रूपये फी ऑनलाईन असणार आहे.
 
या पदांवर होईल भरती
AC मॅकेनिक, 249 पदं
कारपेंटर, 16 पदं
डीझेल मॅकेनिक, 640 पदं
इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रानिक्स, 18 पदं
इलेक्ट्रीशियन, 871 पदं
इलेक्ट्रानिक मॅकेनिक, 102 पदं
फिटर, 1460 पदं
मशीनिस्ट, 74 पदं
MMW, 24 पदं
MMTM, 12 पोस्टं
पेंटर, 40 पोस्टं
वेल्डर, 597 पोस्टं