'सॅमसंग' देणार 'रेडमी'ला टक्कर

'शाओमी' कंपनीचा स्मार्टफोन 'रेडमी नोट ७ प्रो' ला टक्कर देण्यासाठी 'सॅमसंग'ने 'गॅलेक्सी एम ३०' लॉन्च करण्याची घोषणा केली आहे.

Updated: Feb 19, 2019, 11:25 AM IST
'सॅमसंग' देणार 'रेडमी'ला टक्कर  title=

नवी दिल्ली -  'शाओमी' कंपनीचा स्मार्टफोन 'रेडमी नोट ७ प्रो' ला टक्कर देण्यासाठी 'सॅमसंग'ने 'गॅलेक्सी एम ३०' लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. रेडमीने भारतीय बाजारात मोठी पसंती मिळवली आहे. तसेच रेडमी ७ नोट प्रो लॉन्च केल्यानंतर त्यालाही अशीच पसंती मिळणार, असे शाओमी कंपनीने सांगितले. परंतु, शाओमीच्या या स्मार्टफोनला टक्कर देण्यासाठी सॅमसंग कंपनीही मागे राहणार नसल्याचे दिसून आले आहे. २८ फेब्रुवारीला रेडमीचा नोट ७ प्रो लॉन्च करण्यात येणार आहे. महत्वाची बाब अशी आहे की, २७ फेब्रुवारीला म्हणजे शाओमीच्या एकदिवस अगोदर सॅमसंग गॅलेक्सी एम ३० लॉन्च होणार आहे. माहितीनुसार दोन्ही स्मार्टफोनची किंमत कमी आहे.  

रेडमी नोट ७ प्रोची वैशिष्ट्ये
रेडमीच्या या स्मार्टफोनला चीनच्या बाजारात लॉन्च करण्यात आले आहे. या फोनमध्ये ६.३ इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये दोन रिअर कॅमेऱ्यांचा (४८ मेगापिक्सल + ५ मेगापिक्सल) समावेश करण्यात आला आहे. फ्रंट कॅमेरा १३ मेगापिक्सल आहे. ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोअरेज असलेला स्मार्टफोनची किंमत १० हजार ३०० रुपये असणार आहे. ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोअरेज असलेला स्मार्टफोन १२ हजार रुपयांत मिळणार आहे, तसेच ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोअरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत १४ हजार ५०० रुपये आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम ३० ची वैशिष्ट्ये
जानेवारी महिन्यात सॅमसंगने गॅलेक्सी सीरिजमधील दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. २७ फेब्रुवारीला सॅमसंग गॅलेक्सी एम ३० ला लान्च करण्यात येणार आहे. माहितीनुसार, या स्मार्टफोनमध्ये ५ हजार एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. याची किंमत १४ हजार ९०० असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोअरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत १२ हजार ९०० रुपये असणार आहे. ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोअरेज असलेला स्मार्टफोन १० हजार ९९० रुपयांत मिळणार आहे.