close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासहीत येतोय 'रेडमी नोट ८ प्रो', जाणून घ्या फिचर्स

आगामी नोट ८ प्रोच्या मागच्या बाजुला फिंगरप्रिंट स्कॅनरही देण्यात आलाय

Updated: Aug 22, 2019, 09:26 AM IST
पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासहीत येतोय 'रेडमी नोट ८ प्रो', जाणून घ्या फिचर्स

बीजिंग : शाओमीचा सब-ब्रांड असलेल्या 'रेडमी'नं आपला नवा स्मार्टफोन 'नोट ८ प्रो' लवकरच लॉन्च करण्याचा निर्णय जाहीर केलाय. येत्या २९ ऑगस्ट रोजी चीनमध्ये हा स्मार्टफोन पहिल्यांदा ग्राहकांच्या समोर येणार आहे. या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा क्वॅड कॅमरा असेल. मीडिया रिपोर्टनुसार, कंपनीनं चीनी सोशल मीडिया नेटवर्क 'वेइबो'वर नोट ८ प्रोची एक झलक पाहायला मिळतेय. यामध्ये मागच्या बाजुला एकेकाखाली एक असे तीन कॅमेरे दिसत आहेत. तर चौथा कॅमेरा उजव्या बाजुला लावण्यात आलाय. 

आगामी नोट ८ प्रोच्या मागच्या बाजुला फिंगरप्रिंट स्कॅनरही देण्यात आलाय. हा स्मार्टफोन ग्लास सँडविच डिझाईनमध्ये बनवण्यात आलाय. कंपनीकडून 'नोट ८ प्रो'सोबतच 'रेडमी नोट ८' हा फोनदेखील लॉन्च होण्याची शक्यता आहे. 'रेडमी नोट ८'च्या मागच्या भागात चार कॅमेरा सेन्सर फिचर मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. याशिवाय कंपनी 'रेडमी टीव्ही'देखील लॉन्च करणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, नोट ८ प्रोमध्ये स्नॅपड्रॅगन ७०० सीरिज चिपसेट आणि मोठी बॅटरी असेल. हे डिव्हाईस एन्ड्रॉईड ९.० वर आधारीत मीयूआय १० वर चालेल. तसंच यात पॉप-अप सेल्फी कॅमेराही असेल. हा पॉप अप कॅमेरा 'रेडमी'च्या २० सीरिजमध्येही दिसला होता.