रिलायन्स कंपनी बंद करते आपली 'ही' सेवा!

 रिलायन्स कम्युनिकेशन ही कंपनी कर्जात बुडाल्यामुळे महिन्याभरात या २जी मोबाईल सेवा बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 25, 2017, 07:15 PM IST
रिलायन्स कंपनी बंद करते आपली 'ही' सेवा! title=

नवी दिल्ली : रिलायन्स कम्युनिकेशन ही कंपनी कर्जात बुडाल्यामुळे महिन्याभरात या २जी मोबाईल सेवा बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. मात्र कंपनीची ३जी आणि ४जी सुविधा चालू राहणार आहे. औद्योगिक सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. कंपनीचे कार्यकारी निर्देशक गुरदीप सिंह यांनी याबद्दलच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. ३० दिवसात वायरलेस व्यवसाय बंद करण्यात येणार आहे. 

त्यांनी सांगितले की, आयएलडी वॉयस, कंज्यूमर वॉयस, 4G पोस्टपेड डोंगल आणि मोबाईल टॉवर या सुविधा नफा होईपर्यंत चालू ठेवण्याचा कंपनीचा मानस आहे. याव्यतिरिक्त सर्व व्यवसाय बंद करण्यात येणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिंह यांनी सांगितले की, २१ नोव्हेंबरला लायसन्स संपल्यानंतर डीटीएच सेवा देखील बंद केल्या जातील. 

या कंपनीवर ४६ हजार करोडचे कर्ज आहे. या महिन्याच्या सुरुवातीला एयरसेलला व्हायरलेस कारभार विकण्याच्या त्यांचा करार देखील असफल ठरला.