close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

खुशखबर ... जिओच्या १९८ रुपयांच्या प्लानमध्ये बदल

रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे. जिओ आता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक नवीन प्लान घेवून आला आहे. 

Updated: Jul 17, 2019, 06:09 PM IST
खुशखबर ... जिओच्या १९८ रुपयांच्या प्लानमध्ये बदल

मुंबई : रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे. जिओ आता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक नवीन प्लान घेवून आला आहे. जिओच्या १९८ रुपयांच्या प्लानमध्ये बदल करण्यात आला आहे. या प्लानमध्ये जिओ ग्राहकांना १.५ जीबी डेटाऐवजी आता २ जीबी डेटा मिळणार आहे. 

रिलायन्स जिओच्या या प्लान अंतर्गत ग्राहकांना पूर्ण महिनाभर सेवा मोफत दिली जाणार आहे. १९८ रुपयाच्या रिचार्चवर ग्राहाकांना पूर्वी दररोज १.५ जीबी डेटा दिला जात होता. मात्र आता ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा मिळणार आहे. 

या प्लॉन अंतर्गत अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग फ्री आणि प्रतिदिवस १०० एसएमएस फ्री दिले जाणार आहे. या प्लान्ससोबत जिओचे सर्व अॅप्सच सब्सक्रिप्शन ग्राहकांना फ्री मिळणार आहे. या प्लॉनची वैधता २८ दिवसांची आहे.  

जिओच्या ग्राहकांनी ४४९ रुपयांचा रिचार्ज केल्यास त्यांना ३ महिन्यांपर्यंत जिओची सेवा मिळणार आहे. या प्लॉननुसार ३ महिन्यात ग्राहकांना दररोज १.५ जीबी डेटा म्हणजेच १३६.५ डेटा मिळू शकणार आहे. तसेच दररोज १०० एसएमएस फ्री असणार आहे. या प्लॉनची वैधता ९१ दिवसांची आहे.

कोणत्याही मोबाईल कंपनीचा प्लान घेताना किंवा रिचार्ज करण्याआधी योग्य ती माहिती घ्या आणि खात्री केल्यानंतरच रिचार्ज करावा.