close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

JIO च्या १९८ च्या प्लानमध्ये बदल, रोज २ जीबी डेटा

JIO ने आपल्या १९८ रुपयांच्या प्लानमध्ये बदल केला आहे.  

Updated: Jul 16, 2019, 03:01 PM IST
JIO च्या १९८ च्या प्लानमध्ये बदल, रोज २ जीबी डेटा
संग्रहित छाया

मुंबई : JIO ने आपल्या १९८ रुपयांच्या प्लानमध्ये बदल केला आहे. याचा लाभ आता ग्राहकांना होणार आहे. या प्लानमध्ये डेटासह अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग आणि प्रतिदिन १०० एसएमएस दिले जाणार आहेत. या सर्व प्लानबरोबर जिओचे सर्व अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन सुद्धा ग्राहकांना मिळणार आहे. 

रिलायन्स जिओच्या १९८ रुपयांच्या प्लानमध्ये बदल केल्याप्रमाणे ग्राहकांना पूर्ण महिनाभर सेवा मोफत मिळणार आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना १.५ जीबी डेटाऐवजी आता २ जीबी डेटा उपलब्ध होणार आहे. १९८ रुपयांच्या रिचार्जवर ग्राहकांना आधी दररोज १.५ जीबी डेटा दिला जात होता. 

जिओच्या या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग आणि प्रतिदिन १०० एसएमएस दिले जाणार आहे. दरम्यान,  ४४९ रुपयांचा रिचार्ज केल्यास त्यांना तीन महिन्यांपर्यंत जिओची सेवा मिळणार आहे. या प्लानची वैधता ९१ दिवसांची आहे. तीन महिन्यात ग्राहकांना दररोज १.५ जीबी डेटा मिळणार आहे. तसेच दररोज १०० एसएमएस फ्री मिळणार आहे.