Google ला सुद्धा धोका देतात हे ट्रांजेक्शन Apps,आताच Delete करा

जर तुम्ही ऑनलाईन किंवा डिजिटल ट्रांझेक्शन (Digital transaction) वापरत असाल, तर तुम्हाला सावध राहाण्याची गरज आहे. 

Updated: Mar 16, 2021, 04:34 PM IST
Google ला सुद्धा धोका देतात हे ट्रांजेक्शन Apps,आताच Delete करा title=

मुंबई : जर तुम्ही ऑनलाईन किंवा डिजिटल ट्रांझेक्शन (Digital transaction) वापरत असाल, तर तुम्हाला सावध राहाण्याची गरज आहे. कारण काही असे खतरनाक ऍप्स बाजारात आले आहेत, की जे अगदी गुगलला सुद्धा धोका देऊन तुमच्या मोबाईलमध्ये येऊ शकतात आणि त्याता तुम्हाला नुकसान होऊ शकते. जर तुमच्या मोबाईल मध्ये असे ऍप असतील तर लगेचंच डिलीट करा.

मीडिया रीपोर्टनुसार चेक प्वाइंट रिसर्चमध्ये काही अशा खतरनाक मॅलिसियस ऍप्सला आइडेंटिफाय केलं आहे. जे तुमच्या फाइनेंशियल ट्रांझेक्शन धोकादायक आहेत. ज्यामुळे तुमच्या अकाऊंटमधले पैसे काढून घेतले जाऊ शकतात.

फोनमध्ये हे ऍप्स असतील तर लगेच डिलीट करा (Delete this app in your phone, delete it immediately)

जर आपण आपल्या स्मार्टफोनमध्ये केक व्हीपीएन (cake vpn), पॅसिफिक व्हीपीएन (pacific vpn), ईव्हीपीएन (EVPN), बीटप्लेअर (Bit player),  क्यूआर / बारकोड स्कॅनर मॅक्स (barcode scanner max), म्युझिक प्लेयर (Music player) आणि टूलटिप्नेटरलिबरी (Tooltipster liberty) अ‍ॅप डाऊनलोड केले असतील. तर ते तुम्हाला हानी पोहोचवू शकतात.

शक्य तितक्या लवकर  त्यांना आपल्या स्मार्टफोनमधून काढून टाका. हॅकर्स या ऍप्सद्वारे तुमचे बँक तपशील चोरू शकतात.

हे सर्व मॅलिसियस ऍप्स ऍड्रॉईड ऍप्स आहेत. रिपोर्टनुसार हे ऍप्स Clast82 नावाच्या ड्रॉपरने प्रभावित आहेत, जो यूजर्सच्या स्मार्टफोन मध्ये AlienBot Banker आणि MRAT हे मालवेयर इन्स्टॉल करतो.

AlienBot Banker मालवेयर म्हणजेच हा एक व्हायरस आहे, जो फाइनेंशियल ऐप्समध्ये जाऊन तुमचे डिटेल्स चोरी करतो. हा इतका फास्ट आहे की तो Googleच्या नजरेत सुद्धा येत नाही. इतकच काय तर तो व्हायरस टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन कोडला ही चकमा देतो.

तुमच्या डिव्हाइसची काळजी घ्या (Take care of your device)

जर तुम्ही फाइनेंशियल ट्रांझेक्शन मोबाईल वरुन करत असाल, तर त्यामध्ये नेहमी ऑफिशियल ऍप्सच ठेवा. कोणताही ऍप डाऊनलोड करण्यापूर्वी त्या ऍपच्या ऑफिशीयल  वेबसाइटवर दिलेल्या लिंकवरुनच तो ऍप डाऊनलोड करा. स्मार्टफोन आणि ऍप्सला अपडेट करत रहा .फाइनेंशियल ऍप्सला लॅाक ठेवा आणि कोणत्याही थर्ड पार्टी ऍपला डाऊनलोड करु नका.