नवी दिल्ली : टाटा नेक्सननंतर आता आणखी एक नवीन एसयूव्ही भारतीय बाजारात दाखल होण्यास सज्ज झाली आहे. रेनॉल्ट पुढील महिन्यात त्यांची नवीन एसयूवी कॅप्टर ही कार लॉन्च करणार आहेत.
कंपनीने या कारची बुकींग सुरू केली आहे. ग्राहक २५ हजार रूपयांमध्ये या कारची बुकींग करु शकतात. कंपनीने सध्याच या कारची किंमत जाहीर केलेली नाही. पण असे मानले जात आहे की, कंपनी या कारची किंमत १२ ते १३ लाख रूपये ठेवू शकते.
रेनॉल्ट कॅप्टरमध्ये कंपनीने १.५ लिटरचं डिझल इंजिन आणि पेट्रोल इंजिन दिलं आहे. डिझल इंजिन के९के सीरिजचं आहे. आणि १०७.८ बीएसपीचा पावरसोबतच २६० एनएम टॉर्क जनरेट करतं. पेट्रोल व्हेरिएंटमध्ये १.५ लिटरचं एच४केएल इंजिन देण्यात आलंय. हे इंजिन १०३.८ बीएचपीची पावर आणि १४२ एनएम टॉर्क जनरेट करतं. कंपनीने या एसयूवीच्या डिझल इंजिनमध्ये ६ स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशन दिलं आहे. तसेच पेट्रोल व्हेरिएंटसोबत ५ स्पीड मॅन्यूअल गिअरबॉक्स दिला दिलाय.
इंटेरिअरबद्द्ल सांगायचं तर कॅप्टरच्या टॉप व्हेरिएंट प्लाटिनमध्ये लॅदरेटे सीट्स दिली गेली आहेत. याच्या टॉपएन्डमध्ये एलईडी हेडलाईट्ससोबत ड्युअल कलर रूफ फिनिश दिलं गेलंय. एलईडी डेटाइम रनिंग लाईट्स, फ्लोटिंग फ्रन्ट इंडिकेटर्स, ब्लॅक क्लॅडींग, १७ इंच अलॉय व्हिल आणि रिपल इफेक्ट टेललाईट दिलाय. तसेच या कारमध्ये अॅडजेस्टेबल ड्राईव्ह सीट दिली गेलीये. कारमध्ये टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम देण्यात आलंय.