ना Flipkart ना Amazon, येथे सुरु झाला Republic Day Sale, मिळतोय 70 टक्के डिस्काऊंट

26 January Sale: प्रजासत्ताक दिनानिमित्त विजय सेल्समध्ये बंपर सेलला सुरुवात झाली आहे. या सेलमध्ये चांगले डिस्काऊंट, ऑफर्स आणि बँक डिस्काऊंट मिळणार आहेत. या सेलमध्ये आयफोन, लॅपटॉप, घरगुती उपकरण स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.     

शिवराज यादव | Updated: Jan 24, 2024, 03:26 PM IST
ना Flipkart ना Amazon, येथे सुरु झाला Republic Day Sale, मिळतोय 70 टक्के डिस्काऊंट title=

26 January Sale: 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त ई-कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्टने (Flipkart) सेलचं आयोजन केलं आहे. पण जर तुम्हाला अजून चांगल्या डिस्काऊंट आणि ऑफर्सची प्रतिक्षा असेल तर आणखी एका सेलबद्दल जाणून घ्या. विजय सेल्सच्या (Vijay Sales) पोर्टलवर एक सेल लाईव्ह करण्यात आली आहे. या सेलमध्ये तब्बल 70 टक्क्यांचा डिस्काऊंट मिळत आहे. 

विजय सेल्समध्ये Mega Republic Day Sale सुरु आहे. या सेलमध्ये किमान 70 टक्क्यांची सूट दिली जाणार आहे. म्हणजेच 10 हजारांच्या खरेदीवर तब्बल 7500 रुपयांची सूट असेल. एचडीएफसी बँकेच्या कार्डवर 4000 रुपयांचा इंस्टंट कॅशबॅक मिळत आहे. 

या सेलदरम्यान स्मार्टफोन, आयफोन, TWS इअरबड्स, स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप आणि गृहोपयोगी वस्तूंवर सवलत आहे. याशिवाय गीझर, इलेक्ट्रिक हिटर इत्यादींवरही सूट उपलब्ध आहे, ज्यामुळे तुम्हाला थंडीपासून बचाव करण्याची संधी आहे. 

iPhone 15 वरही मिळतोय डिस्काऊंट

विजय सेल्समध्ये iPhone 15 वरही डिस्काऊंट मिळत आहे. या सेलमध्ये iPhone 15 (128GB)  ची किंमत 72 हजार 990 रुपयांत लिस्टेड आहे. ही किंमत Apple Store च्या तुलेत कमी आहे. Apple च्या अधिकृत स्टोअरवर याची किंमत 79 हजार 900 रुपये आहेत. याशिवाय iPhone 15 Plus वरही डिस्काऊंट आहे. 

टॅब्लेटवर 40 टक्के सूट

विजय सेल्सच्या या सेलमध्ये टॅब्लेटवरही चांगली सवलत दिली जात आहे. वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, टॅब्लेटवर 40 टक्के सूट जाहीर करण्यात आली आहे. सेलमध्ये Samsung, Lenovo, Redmi, Realme चे टॅब्लेट लिस्टेड करण्यात आले आहेत. विजय सेल्सच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही या ऑफर्सचा फायदा उचलू शकता.