विषय कट! Royal Enfield ची नवी बाईक येतेय तुमच्या भेटीला; 30 ऑगस्ट तारीख लक्षात ठेवा

Royal Enfield Bullet 350 : लेका बाईक चालवत पार लडाख, उत्तराखंडपर्यंत जायचंय... संपूर्ण देशभर फिरायचंय असं म्हणणारे अनेक बाईकप्रेमी तुम्ही पाहिले असतील. इतकंच काय, तर तुम्हीही यापैकीच एक असाल...   

सायली पाटील | Updated: Jul 22, 2023, 02:10 PM IST
विषय कट! Royal Enfield ची नवी बाईक येतेय तुमच्या भेटीला; 30 ऑगस्ट तारीख लक्षात ठेवा  title=
Royal Enfield Bullet 350 to be launched on 30 august read features

Royal Enfield Bullet 350 : भारतातील रस्ते, हवामान आणि इथल्या बाईकप्रेमींची बाईक चालवण्याची शैली पाहता प्रत्येक बाईक कंपनी अगदी त्यांना हव्या तशाच बाईक तयार करण्याला प्राधान्य देते. या साऱ्यामध्ये सर्वाधिक पसंती मिळते ती म्हणजे  रॉयल एनफील्ड (Royal Enfield) च्या बाईक्सना. 

रॉयल एनफील्ड (Royal Enfield) ही बाईक तिचा दणकट लूक, दमदार इंजिन आणि ऑफरोडिंग स्किल्समुळं अनेकांच्याच आवडीची. बरं, तिचे दरही अनेकांनच्या खिशाला परवडतील असे. त्यामुळं बाईकप्रेमींची पहिली पसंती कायमच एनफिल्डला जाताना दिसते. अशी ही बाईक अर्थात एनफिल्डची बुलेट 350 एका नव्या अंदाजात तुमच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. या नव्या बाईकसाठी कंपनीकडून टीझरही लाँच करण्यात आला आहे. 

कधी लाँच होतेय बाईक? 

तुम्हीही एनफिल्डच्या एका चांगल्या पर्यायाच्या प्रतीक्षेत असाल, तर Bullet 350 एकदा पाहूनच घ्या. अवघ्या काही दिवसांत, म्हणजेच 30 ऑगस्ट रोजी ही बाईक अखेर लाँच होणार आहे. यामध्ये खास बाब असेल ती म्हणजे न्यू जनरेशन प्लॅटफॉर्म. ज्यामुळं तुम्हाला अनेक अद्ययावत बदल बाईकमध्ये दिसू शकतात. 

हेसुद्धा वाचा : बाबो... एका चुकीमुळं Indian Railway नं 'या' व्यक्तीच्या नावावर केली संपूर्ण ट्रेन

 

किमतीचं सांगावं तर, एनफिल्डच्या नव्या बुलेट 350 च्या दरात काही अंशांनी वाढ केली जाऊ शकते. पण, ही वाढ फारशी मोठी नसल्यामुळं स्पर्धेत असणाऱ्या इतर बाईकच्या तुलनेतच हे दर ठेवण्यात येतील असं सांगण्यात आलं आहे. सध्याच्या घडीला बुलेट 350 ची किंमत 1.60 ते 1.69 लाखांच्या दरम्यान आहे. तेव्हा आता त्यात नेमकी किती वाढ होते हे पाहणं महत्त्वाचं असेल. या बुलेटला हार्ले डेव्हिडसन आणि ट्रायम्फ च्या नव्या मॉडेल्सची टक्कर असणार आहे. 

बाईकचे फिचर्स एकदा पाहून घ्या... 

एनफिल्डची बाईक खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर तुम्हाला इथंही जुनं डिझाईन पाहता येईल. इथं काही प्राथमिक कॉस्मेटिक बदलांकडे मात्र दुर्लक्ष करता येणार नाही. जुन्हा बाईकमध्ये असणारे बॉडी पॅनल आणि स्पोक व्हील या नव्या बाईकमध्ये कायम असतील. यंदाच्या वर्षी तुमच्या भेटीला येणाऱ्या बुलेटमध्ये क्लासिक 350चं  टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेंशन असेल तर, मागच्या बाजूला क्लासिक 350चं ट्विन शॉक एब्जॉर्बर असेल. 

बाईकचं इंजिन 346cc क्षमतेचं असून त्यामधून 19bhp आणि 28Nm चा टॉर्क जनरेट केला जाईल. काही नव्या बदलांमुळं या इंजिनची कार्यक्षमता अधिक प्रभावी बनेल असा कंपनीचा दावा आहे. क्लासिक 350 आणि मेट्योर 350 मध्ये वापरात आणल्या जाणाऱ्या J प्लॅटफॉर्मवर नव्या बुलेट 350चं इंजिन आधारलेलं असेल.