Samsung कडून सर्वात स्वस्त स्मार्टफोन लवकरच लॉंच; फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

Samsung Galaxy M13 Series Launch Date:दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त स्मार्टफोन घेऊन येत आहे.

Updated: Jul 7, 2022, 04:27 PM IST
Samsung कडून सर्वात स्वस्त स्मार्टफोन लवकरच लॉंच; फीचर्स आणि किंमत जाणून घ्या title=

मुंबई : Samsung Galaxy M13 Series Launch Date:दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त स्मार्टफोन घेऊन येत आहे. कंपनीने अधिकृतपणे आपल्या नवीन M-सिरीज स्मार्टफोनच्या लॉन्चिंगची तारीख जारी केली आहे.  Galaxy M13 5G आणि Galaxy M13 हे स्मार्टफोन 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता बाजारात दाखल होतील.

Samsung Galaxy M13 5G स्टोरेज

कंपनीच्या मते, Samsung Galaxy M13 5G फोनला 11 बँडसह 5G कनेक्टिव्हिटी मिळेल. यात 12GB रॅम स्टोरेज आणि ऑटो डेटा स्विचिंग फीचर असेल. तुमचे प्राथमिक सिम नेटवर्कच्या बाहेर असल्यास, त्याच्या मदतीने तुम्ही कनेक्ट केले जाल.

Samsung Galaxy M13 5G बॅटरी आणि अंदाजित किंमत

Samsung Galaxy M13 च्या 5G प्रकारात 5000 mAh बॅटरी दिली जाईल, जिथे 4G प्रकारात 4000 mAh बॅटरी उपलब्ध असेल. या फोनची किंमत जवळपास 15,000 रुपये असण्याची शक्यता आहे. कंपनीने अद्याप किंमतीबद्दल खुलासा केलेला नाही.

Samsung Galaxy M13 4G कॅमेरा सेटअप

Galaxy M13 4G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल. सध्या, कंपनीने कॅमेरा सेन्सरबद्दल कोणतीही माहिती जारी केलेली नाही.  फोनला 50MP मुख्य कॅमेरा, 5MP अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 2MP डेप्थ कॅमेरा सेन्सर मिळेल. अशी माहिती मिळतेय.

Samsung Galaxy M13 4G बॅटरी आणि रंग पर्याय

Galaxy M14 6000 mAh बॅटरीसह येईल, ज्याला 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. याशिवाय Amazon India ने आपल्या मायक्रो साइटवर खुलासा केला आहे की हा स्मार्टफोन ग्रीन आणि डार्क ब्लू या दोन रंगांच्या पर्यायांसह उपलब्ध असेल.

Samsung Galaxy M13 कॅमेरा आणि कनेक्टिव्हिटी

दुसरीकडे, Galaxy M13 5G ड्युअल कॅमेरा सेटअप सह येऊ शकतो. यात 5000 mAh बॅटरी असू शकते, जी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. Samsung Galaxy M13 5G प्रमाणेच यामध्ये 11 5G बँडला सपोर्ट करेल. हे दोन्ही उपकरण 12 जीबी रॅमसह येतील, जे रॅम आणि रॅम प्लसचे संयोजन आहे.