१२ सप्टेंबरला येतोय सॅमसंग गॅलेक्सी नोट ८

सॅमसंगची निमंत्रण पत्रिका पाहता गॅलेक्सी नोट ८ भारतात येत असल्याची चिन्हे आहेत. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 8, 2017, 04:44 PM IST
१२ सप्टेंबरला येतोय सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ title=

नवी दिल्ली:  सॅमसंगने स्मार्टफोन नोट ८ गेल्या महिन्यात जागतिक स्तरावर लॉंच केल्यानंतर हा फोन आता भारतात येत आहे. कंपनीचा नवी दिल्लीमध्ये १२ सप्टेंबरला दुपारी १२.३० वाजता इव्हेंट होणार आहे. सॅमसंगने मीडियाला यासंबंधीचे आमंत्रण पाठविले आहे.
याची निमंत्रण पत्रिका पाहता गॅलेक्सी नोट ८ भारतात येत असल्याची चिन्हे आहेत. कंपनीने या कार्यक्रमासाठी मीडियाला निमंत्रण देण्यास सुरुवात केली आहे. १२ सप्टेंबरला अॅपलदेखील आपला पुढचा फ्लॅगशिप फोन लॉन्च करणार आहे.

काय आहेत फिचर्स ?

६.३ इंचचा क्वाड एचडी प्लस सुपर AMOLED डिस्प्ले
गॅलेक्सी एस ८ आणि गॅलेक्सी एस ८ प्लसप्रमाणे इनफिनिटी डिस्प्ले
या फोनच्या मागे १२MP दोन कॅमेरे (ऑप्टिकल इमेज स्टेबलायजेशन सपोर्ट )
८एमपी फ्रंट कॅमेरा
 बॅटरी३,३०० एमएएच
गॅलेक्सी नोट ७.१.१ नूग आणि नोट सीरीयामध्ये इतर फोनसारखे IP ६८ चे प्रमाणीकरण
हा फोन वायरलेस चार्जिंग सपोर्ट
६ जीबी रॅम क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर
इनबिल्ट स्टोरेज ६४जीबी, १२८ जीबी आणि २५६ जीबीचे तीन पर्याय
मायक्रो एसडी कार्डचा पर्याय