Samsung च्या 'या' 5G फोनवर बंपर डिस्काउंट, 15 हजारांपर्यंत होईल बचत, किंमत पाहा

Samsung Galaxy S23FE: तुम्ही फोन घ्यायचा विचार करताय? तर सॅमसंगने तुमच्यासाठी आणलीये खास ऑफर. यामुळं तुम्हाला स्वस्तात फोन खरेदीची संधी मिळणार आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 13, 2024, 04:25 PM IST
Samsung च्या 'या' 5G फोनवर बंपर डिस्काउंट, 15 हजारांपर्यंत होईल बचत, किंमत पाहा title=
Samsung Galaxy S23FE price cut Check new price and features

Samsung Galaxy S23FE: सॅमसंग गॅलेक्सीने काही महिन्यांपूर्वीच म्हणजेच ऑक्टोबर 2023मध्ये Samsung Galaxy S23FE स्मार्टफोन लाँच केला होता. या स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फिचर्स आणि कमाल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50 MP चे प्रायमरी कॅमेरा आणि फास्ट चार्जर देण्यात आला आहे. आता या कंपनीने या फोनच्या दोन व्हेरियंटवर ऑफर्स दिल्या आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन स्वस्तात घेण्याची संधी आहे. 

Samsung Galaxy S23FE स्मार्टफोन लाँच झाल्यानंतर त्याची किंमत 64,999 रुपये इतकी होती. आता या स्मार्टफोनची किंमत कमी करण्यात आली आहे. किंमत कमी केल्यानंतर हा स्मार्टफोन कितीला येणार आणि यात कोणते फिचर्स आहेत, याबाबत जाणून घ्या. 

Samsung Galaxy S23FE दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. यात 8GB + 128 GB आणि 8GB + 256 GB असे दोन व्हेरियंट उपलब्ध आहेत. दोन्ही व्हेरियंटवर पाच हजारांचे डिस्काउंट मिळत आहेत. सर्व प्रकारच्या कलर ऑप्शनवर हे डिस्काउंट उपलब्ध आहे. या डिस्काउंटनंतर 128 GB व्हेरियंटची किंमत 54,999 रुपये इतकी झाली आहे. तर, 256 GB व्हेरियंटची किंमत घसरून 64,990 रुपये इतकी झाली आहे. तसंच, जर तुम्ही HDFC Credit Card आणि Debit Card वर 10 हजार रुपयांपर्यंतचे डिस्काउंट मिळणार आहे. 

Samsung Galaxy S23FE चे फिचर्स 

Samsung Galaxy S23FE मध्ये 6.4 इंचाच  Dynamic AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 120 Hz रिफ्रेश रेट्सचा डिस्प्ले आहे. तसंच, व्हिजन बूस्टर टेक्नोलॉजीही देण्यात आली आहे. ज्यामुळं बाहेर किंवा सूर्यप्रकाशात असल्यावर व्हिजिबिलीटी वाढते. 

Samsung Galaxy S23FE चा कॅमेरा

Samsung Galaxy S23FEमध्ये ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात प्रायमरी कॅमेरा 50 MP चा आहे. तर, सेकेंडर कॅमेरा 12 MPचा अल्ट्रा वाइड अँगल सेंसर देण्यात आला आहे. तर, तिसरा लेन्स 8MP 3X ऑप्टिकल झूमची आहे. 

Samsung Galaxy S23FEचा प्रोसेसर 

Samsung Galaxy S23FEमध्ये EXynos 2200 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. यात 8GB रॅम मिळते. स्मार्टफोनचे तापमान कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी Vapor Chamberचा वापर करण्यात आला आहे. यात 4500 mAh बॅटरीची क्षमता आहे. तर, 25W चे फास्ट चार्जर देण्यात आले आहे.