मोबाईल टेक्नोलॉजीत होणार मोठी क्रांती, 2024 मध्ये सॅमसंग आणणार AI फोन

Samsung Galaxy S24: गेल्या काही महिन्यांत कंपनीने एआर ग्लासेस आणि स्मार्ट रिंग्स सारख्या नवीन उत्पादन श्रेणींसाठी ट्रेडमार्कसाठी देखील अर्ज केल्याची माहिती समोर येत आहे.

Pravin Dabholkar | Updated: Nov 27, 2023, 06:39 PM IST
मोबाईल टेक्नोलॉजीत होणार मोठी क्रांती, 2024 मध्ये सॅमसंग आणणार AI फोन title=

Samsung Galaxy S24: सध्या जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयची जोरदार चर्चा आहे. एआयमुळे सर्वकामे जलद गतीने होऊ लागली आहेत. या स्पर्धेत आता मोबाईल कंपन्याही मागे राहिल्या नाहीत. त्यांनी आपल्या हॅंडसेटमध्ये एआय तंत्रज्ञान देण्यास सुरुवात केली आहे. सॅमसंगच्या आगामी फ्लॅगशिप Galaxy S24 सीरीजची खूप चर्चा होत आहे. आयफोन 15 नंतर प्रत्येकजण सॅमसंगच्या S24 मालिकेची वाट पाहत आहे. गॅलेक्सी S24, गॅलेक्सी S24+ आणि गॅलेक्सी S24 अल्ट्रा हे मोबाईल 17 जानेवारी रोजी जागतिक स्तरावर लॉन्च केले जाण्याची शक्यता आहे. द इलेकच्या विशेष अहवालात यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. यासोबतच सॅमसंगने गॅलेक्सी झेड फोल्ड 7 आणि गॅलेक्सी S25 सारख्या दोन वर्षांनंतर येणाऱ्या हॅंडसेटसाठी ट्रेडमार्कसाठी अर्ज केला आहे. 

गेल्या काही महिन्यांत कंपनीने एआर ग्लासेस आणि स्मार्ट रिंग्स सारख्या नवीन उत्पादन श्रेणींसाठी ट्रेडमार्कसाठी देखील अर्ज केल्याची माहिती समोर येत आहे. मोबाईल टेक्नोलॉजी विश्वात ही मोठी क्रांती मानली जात आहे. 

गॅलेक्सी S24  AI फोन 

सॅमसंग कंपनीने 2024 मध्ये आपले संपूर्ण लक्ष AI वर असल्याची माहिती दिली आहे. Sammobileने यासंदर्भात वृत्त दिले आहे. सॅमसंग गॅलेक्सी एआय बाजारात येण्याच्या वृत्ताला कंपनीने दुजोरा दिला आहे.  S24 सीरीज लाँच करताना  हे इंट्रोड्यूस केले जाईल. यात एआय तंत्रज्ञान असेल, असे सांगण्यात आले आहे. डच वेबसाइट गॅलेक्सी क्लबला अनेक देशांमध्ये अ‍ॅप्लिकेशन्स सापडले आहेत. गॅलेक्सी S24 AI फोन म्हणून लॉन्च केला जाईल, असा म्हटले जात आहे. ब्रँडने एआय फोन आणि एआय स्मार्टफोनसाठी ट्रेडमार्क नोंदणी केले आहे. यामुळे कंपनीने AI वर लक्ष केंद्रित करत असल्याचे दिसते.

ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी ग्लासेस व्यतिरिक्त, सॅमसंगने टेलिव्हिजन, स्मार्टफोन स्क्रीन आणि मॅजिक पिक्सेल, फ्लेक्स मॅजिक आणि फ्लेक्स मॅजिक पिक्सेल यांसारखी नावे आणि लोगो असलेल्या इतर उत्पादनांसाठी ट्रेडमार्क अर्जही दाखल केले आहेत. कंपनी AI Galaxy S24 मालिकेत महत्त्वाची भूमिका बजावेल, असे संकेत यातून दिसत आहेत. असे असले तरी ही नावे मर्यादित असल्याने त्यांना ट्रेडमार्क करता येत नाही, असेही सांगण्यात येत आहे.