सॅमसंगने आणलाय तुमच्या बजेटमधला फोन

सॅमसंगने आपल्या पसंतीच्या जे सीरीजमध्ये एक नवीन फोन (सॅमसंग गॅलेक्सी जे २) आणला आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Oct 12, 2017, 11:18 AM IST
सॅमसंगने आणलाय तुमच्या बजेटमधला फोन title=

नवी दिल्ली : बेस्ट सेलर सॅमसंगने आपल्या पसंतीच्या जे सीरीजमध्ये एक नवीन फोन (सॅमसंग गॅलेक्सी जे २) आणला आहे. या कंपनीचा हा दुसरा बजेट फोन आहे, परंतु या फोनबद्दल कंपनीतर्फे कोणतीही माहिती देण्यात आली नाही. कंपनीतर्फे वेबसाइटवरील लिस्टमध्ये या स्मार्टफोन दिसत आहे. या नव्या स्मार्टफोनची किंमत ७,३९० रुपये आहे. हा फोन सध्या बाजारात उपलब्ध नाही. पण सणासुदीच्या काळात तो लवकरच येण्याची शक्यता आहे.

डिस्प्ले 

सॅमसंगच्या नवीन फोनमध्ये गॅलेक्सी जे २ चा ४.७ -इंच QHD (५४०x९६०पिक्सेल्स) सुपर अमोलिड डिस्प्ले आहे. या रेंजमध्ये हा एक उत्तम पर्याय आहे.

रॅम

 जे २ मध्ये एक १ जीबी रॅम आहे. या फोनमध्ये ८ जीबी इंटरनल स्टोरेज आहे पण यूजर ४.३ जीबीचाच वापर करु शकतात. यातील बरेच अॅप्स त्यात प्रीलोड होतील. 
 मायक्रो SD कार्डची मेमरी १२८ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. 

प्रोसेसर आणि कॅमेरा

सॅमसंगच्या नवीन स्मार्टफोनमध्ये १.३ गीगाहर्ट्ज चा क्वाड-कोर एक्सीनॉस प्रोसेसर आहे. गॅलेक्सी जे २ (२०१७ ) मध्ये ५ मेगापिक्सल का रियर ऑटोफोकस कॅमेरा आहे. तसेच फ्लॅश देखील आहे फोनमध्ये फ्रंट पॅनेलवर २ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.

कनेक्टिव्हिटी

ड्युअल सिमला सपोर्ट करणारा हा स्मार्टफओन यूएसबी ओटीजीलाही सपोर्ट करतो. कनेक्टिव्हिटी फिचरमध्ये ४ जी, जीपीआरएस / ईडीजीई, ३ जी, वाय-फाय ८०२.११ बी / जी / एन, ब्ल्यूटूथ ४.१, जीपीएस, ग्लोनास आणि३.५ एमएम ऑडिओ जैक.

कलर 

मेटालिक गोल्ड आणि ब्लॅक कलरमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. त्याचे आकारमान १३६.५ x६९x८.४ मिलीमीटर आहे आणि त्याचे वजन १३० ग्रॅम आहे. हँडसेटची बॅटरी २००० mAh आहे. स्वचलित मेमरी मॅनेजमेंटसाठी स्मार्टफोन मॅनेजर गॅलेक्सी जे २ (२०१७) मध्ये देण्यात आले आहे. यामूळे युजर्स ५०% डेटा वाचवू शकणार आहे असा दावा कंपनीने केला आहे.