सॅमसंगचे दोन 'दमदार' फोन लॉन्च, पाहा फिचर्स

...

Updated: Jun 11, 2018, 08:23 AM IST
सॅमसंगचे दोन 'दमदार' फोन लॉन्च, पाहा फिचर्स  title=

मुंबई : स्मार्टफोन्सच्या विश्वात धुमाकूळ घालणाऱ्या सॅमसंग कंपनीने आपले दोन नवे स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. गॅलेक्सी J3 (2017) आणि गॅलेक्सी J7 (2017) या दोन फोन्सला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर कंपनीने आपले आणखीन दोन फोन्स लॉन्च केले आहेत. लॉन्च केलेले फोन्स गॅलेक्सी J3 (2018) आणि J7 (2018) हे आहेत.

कंपनीने या दोन्ही फोन्सची किंमत आणि उपलब्धता यांच्याबाबत अद्याप माहिती दिलेली नाहीये. सॅमसंग कंपनीने दावा केला आहे की, दोन्ही फोन्स हे बजेट फोन्सच्या रेंजमधील आहेत. हे दोन्ही फोन्स अमेरिकेतील ठराविक रिटेल आणि कॅरियर पार्टनर्सतर्फे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. दोन्ही फोन्समध्ये दमदार फिचर्स आहेत. 

गॅलेक्सी J3 (2018)चे फिचर्स

अँड्रॉईडवर चालणाऱ्या सॅमसंग गॅलेक्सी J3 (2018) फोनमध्ये 720X1280 पिक्सल रिझॉल्युशन असलेला 5 इंचाचा एचडी डिस्प्ले फोनला देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये 8 MPचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर, सेल्फीप्रेमींसाठी 5 MP चा फ्रँट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनच्या बॅटरी संदर्भात कंपनीने अद्याप माहिती दिलेली नाहीये.

गॅलेक्सी J7 (2018)चे फिचर्स

सॅमसंग गॅलेक्सी J7 (2018) या फोनमध्ये 20X1280 पिक्सल रिझॉल्युशन असलेला 5.5 इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. 13MP चा रियर आणि 13 MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये जास्त पावरफूल बॅटरी देण्यात आल्याचं लॉन्चिंगवेळी सांगण्यात आलं.

सॅमसंग गॅलेक्सी J3 (2018) आणि गॅलेक्सी J7 (2018) फोनमध्ये Samsung Knox इंटिग्रेट असेल. फोनमध्ये रियल टाईम कस्टमर केअर सपोर्टसाठी सॅमसंग+ अॅप देण्यात आला आहे. यासोबतच लाईव्ह वॉईस चॅट, कम्युनिटी सपोर्ट आणि टिप्स सारखे इतरही फिचर्सचा समावेश आहे.