Scammer Got Scammed: सोशल मीडियावरुन होणारी आर्थिक फसवणूक आता फारशी काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. वेगवेगळ्या माध्यमातून आर्थिक फसवणूक केली जाते. कधी मोबाईलवरुन तर कधी इमेलवरुन आर्थिक गंडा घालण्याचे प्रकार घडत असल्याचे अनेक प्रकार समोर येतात. कधी ही फसवणूक काही हजारांची असते तर कधी ही फसवणूक लाखोंची फसवणूक अशी ऑनलाइन माध्यमातून केली जाते. मात्र फसवणूक करणाऱ्यालाच गंडा घालतल्याचा एक रंजक प्रकार सध्या समोर आला आहे.
व्हॉट्सअपवरुन आर्थिक गंडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीनेच अक्कल हुशारीने गंडवल्याचा प्रकार घडला. या स्कॅमरला गंडवणाऱ्या व्यक्तीनेच दोघांमधील संवादाचे व्हॉट्सअप चॅटचे स्क्रीनशॉट पोस्ट केले आहेत. या पोस्टमध्ये सदर व्यक्तीने गंडा घालणाऱ्याला कशाप्रकारे आपल्या जाळ्यात फसवलं हे सांगितलं आहे. या व्यक्तीची कनव्हिन्सींग पॉवर इतकी दमदार होती की गंडा घालण्यासाठी आलेल्या व्यक्तीनेच या व्यक्तीला 20 रुपये पाठवले.
'स्कॅमरलाच गंडा घातला' अशा कॅप्शनसहीत हे स्क्रीनशॉट शेअर करण्यात आले आहेत. या स्क्रीनशॉटमध्ये सुरुवातीला हा गंडा घालणारा व्यक्ती मला काही तासांसाठी पैसे हवे आहेत असं म्हणत 1000 रुपयांची मागणी करतो. समोरची व्यक्ती त्याला पैसे पाठवण्यास तयार होते. पण आपण पैसे पाठवताना एरर येत असल्याचा स्क्रीनशॉट ही व्यक्ती स्कॅमरबरोबरच शेअर करत काहीतरी तांत्रिक अडचण येत आहे, असं सांगते. मी पैसे पाठवण्याचा प्रयत्न करतोय पण पैसे जात नाहीयेत. एक काम कर तूच मला 20 रुपये पाठव, असा मेसेज ही व्यक्ती स्कॅमरला करते. त्यावर हा स्कॅमर पैसे पाठवतो. पैसे पाठवल्यानंतर मी पैसे पाठवले असा मेसेज समोरच्या व्यक्तीला करतो. त्यावर ही व्यक्ती मला पैसे मिळाले असं सांगून या स्कॅमरला ब्लॉक करते.
पोस्टला 2.2 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर रंजक प्रतिक्रिया नोंदवताना, आधुनिक जगातील अडचणींवर शोधलेलं हे आधुनिक उत्तर आहे, असं म्हटलं आहे. अन्य एकाने मला यासंदर्भात मार्गदर्शन कर मित्रा, असं म्हटलं आहे. तू ग्रेट आहेस मित्रा असं तिसऱ्या व्यक्तीने म्हटलं आहे.
Scammer got scammed pic.twitter.com/TqHq9SnNpe
— Jay (@enoughjayy) July 2, 2024
ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून 5.7 हजारांहून अधिक जणांनी रिट्वीट केली आहे. त्यावर 1700 हून अधिक प्रतिक्रिया नोंदवण्यात आल्या आहेत.