सेबीमध्ये विविध पदांच्या १३४ जागांची भरती

लॉकडाऊनच्या काळात एक चांगली बातमी आहे. सेबीमध्ये (SEBI) नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. 

Updated: Jul 25, 2020, 08:37 AM IST
सेबीमध्ये विविध पदांच्या १३४ जागांची भरती title=
संग्रहित छाया

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात एक चांगली बातमी आहे. सेबीमध्ये (SEBI) नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. सेबीमध्ये विविध पदांच्या १३४ जागांची भरती करण्यात येत आहे. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. जनरल ८० जागा भरण्यात येणार आहेत तर लिगल  २८ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी विधी शाखेची पदवी महत्वाची आहे. तर  इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी १७ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.

आरोग्य विभागात २३५ जागांची भरती

नोकरीसाठी वयोमर्यादा २९ फेब्रुवारी २०२० रोजी वय वर्षे ३० पेक्षा जास्त नसावे अशी आहे. तर शैक्षणिक पात्रता पदवीमध्ये इंग्रजी विषयासह हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा पदवीमध्ये हिंदी विषयासह संस्कृत, इंग्रजी, इकॉनॉमिक्समध्ये पदव्युत्तर पदवी आवश्यकता आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२० आहे.

या पदांसाठी अर्ज करा 

पदाचे नाव : जनरल - ८० जागा

शैक्षणिक पात्रता : विधी शाखेची पदवी, अभियांत्रिकी पदवी, सीए/सीएस/ सीएफए आणि कुठल्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी

पदाचे नाव : लिगल - २८ जागा

शैक्षणिक पात्रता : विधी शाखेची पदवी

पदाचे नाव : इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी - १७ जागा

शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी पदवी किंवा कम्पयुटर ॲप्लीकेशनमध्ये पदव्युत्तर पदवी

पदाचे नाव : अभियंता (civil) - ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी पदवी (civil)

पदाचे नाव : अभियंता (Electrical) - ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी पदवी (Electrical)

पदाचे नाव : रिसर्च - ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी

पदाचे नाव : ऑफिशियल लॅग्वेज - ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : पदवी मध्ये इंग्रजी विषयासह हिंदी मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा पदवी मध्ये हिंदी विषयासह संस्कृत, इंग्रजी, इकॉनॉमिक्समध्ये पदव्युत्तर पदवी

वयोमर्यादा : दि. २९ फेब्रुवारी २०२० रोजी वय वर्षे ३० पेक्षा जास्त नसावे

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३१ जुलै २०२०

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2WT88Xs आणि https://bit.ly/3hwyfv3

ऑनलाईन अर्जाकरिता : https://bit.ly/3fXmkWF