WhatsApp चॅट लपवण्यासाठी फोन लॉक करण्याची आता गरज नाही, वापरा हे भन्नाट टीप्स

नवीन संदेश येताच ही चॅट पुन्हा दिसायची.

Updated: Feb 14, 2022, 01:17 PM IST
 WhatsApp चॅट लपवण्यासाठी फोन लॉक करण्याची आता गरज नाही, वापरा हे भन्नाट टीप्स  title=

मुंबई : आपण व्हॉट्सअॅपवर अनेकांशी संवाद साधतो. यातील काही चॅट्स अगदी वैयक्तिकही असतात, तर काही गप्पा निरुपयोगी असतात. अशा परिस्थितीत लोक त्यांच्या गप्पा लपवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरतात.

फोन लॉक ठेवणे हा सर्वात सामान्य उपाय आहे. पण यामुळे तुमच्या व्हॉट्सअॅपमध्ये काहीतरी दडले आहे असा संशय येतो. आता एक नवा मार्ग समोर आला आहे. ज्यासाठी तुम्हाला तुमचा फोन किंवा व्हॉट्सअॅप लॉक ठेवण्याची गरज नाही आणि तुमचे चॅटही लपवले जाईल.

व्हॉट्सअ‍ॅपचा हा उपाय अगदी सोपा आहे, ती म्हणजे अर्चिव्ह चॅट ( Whatsapp Archived Chats ) यापूर्वी, या वैशिष्ट्याची समस्या अशी होती की जेव्हाही तुम्ही चॅट संग्रहित करायचे, तेव्हा नवीन संदेश येताच ही चॅट पुन्हा दिसायची.

व्हॉट्सअॅपने आता हे फीचर बदलले आहे. Archived Chats द्वारे, तुम्ही चॅट कायमस्वरूपी लपवून ठेवू शकता आणि नवीन संदेश आल्यानंतरही ते पुन्हा चॅटमध्ये वर येणार नाहीत.