नवी दिल्ली : आजकाल व्हॉट्स अॅप वापरत नाही, असे लोक दुर्मिळच असतील. आपण सर्वच याचा वापर करतो. तरी देखील व्हॉट्स अॅपच्या काही ट्रिक्स आपल्याला माहित नाहीत. तर जाणून घेऊया काही खास ट्रिक्स...
आपण मेसेज पाठवल्यावर तो केव्हा डिलिव्हर झाला आणि तो केव्हा वाचला गेला, याची माहिती आपल्याला मिळू शकते. यासाठी एक सोपी ट्रिक आहे. तसंच त्यासाठी कोणतंही अॅप किंवा सॉफ्टवेअर इंस्टॉल करण्याची गरज नाही.
असे घ्या जाणून...
१. सर्वात आधी व्हॉट्स अॅप ओपन करा. कोणत्या मेसेजबद्दल माहिती हवी आहे, त्याचे चॅट ओपन करा.
२. चॅट ओपन केल्यावर ज्या मेसेजची माहिती हवी आहे अशा तुम्ही पाठवलेल्या मेसेजवर प्रेस करा. त्यानंतर तो मेसेज सिलेक्ट होईल. मग व्हॉट्स अॅपवर सर्वात वर आय आयकोन असलेला पर्याय असेल. तिथे क्लिक करा.
३. (i)वर क्लिक केल्यावर त्यात तुम्हाला मेसेजचे पूर्ण डिटेल्स मिळतील.
४. निळ्या रंगाचे निशाण असेल त्यासोबत Read लिहिलेले असेल. त्याचबरोबर मेसेज वाचल्याची वेळही लिहीलेली असेल. त्याखाली मेसेज डिलीव्हर झाल्याची वेळ दिलेली असेल.