Facebook, Instagram ला दुसऱ्यांदा मागावी लागली माफी, पुन्हा सेवा ठप्प

Facebook, Instagram apologize : फेसबुक आणि इन्स्टाग्रामने एका आठवड्यात दुसऱ्यांदा बंद पडले. त्यामुळे त्यांच्यावर माफी मागण्याची वेळ आली. 

Updated: Oct 9, 2021, 09:13 AM IST
Facebook, Instagram ला दुसऱ्यांदा मागावी लागली माफी, पुन्हा सेवा ठप्प title=

मुंबई : Facebook, Instagram apologize : फेसबुक आणि इन्स्टाग्रामने एका आठवड्यात दुसऱ्यांदा बंद पडले. त्यामुळे त्यांच्यावर माफी मागण्याची वेळ आली. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर फेसबुक आणि इन्स्टाग्रामची सेवा बंद पडली. जवळपास दोन तास बंद होती. त्यामुळे यूजर्सची त्यांना माफी मागावी लागली आहे.  Facebook, Instagramची सेवा एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा प्रभावित झाल्याने अनेकांना त्रासाचा सामना करावा लागला. (Social media Facebook, Instagram apologize for second outage in a week)

 Facebook, Instagramने यावर स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, 'आम्हाला माहिती आहे की काही लोकांना आमच्या अॅप्स आणि उत्पादनांमध्ये प्रवेश करण्यात अडचण येत आहे. आम्ही शक्य तितक्या लवकर सर्व गोष्टी पूर्ववत करण्यावर काम करत आहोत आणि झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.'  फेसबुक आणि इन्स्टाग्राम जवळजवळ दोन तासांनंतर सुरु झाले.

एका आठवड्यात दुसऱ्यांदा, इन्स्टाग्राम आणि फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटचे सर्व्हर डाऊन झाले. फेसबुक आणि इन्स्टाग्राम या दोघांनी ट्विट करून आपल्या यूजर्सची माफी मागितली आहे. दरम्यान, दोन्ही नेटवर्किंग साइट रात्री 2:17 वाजता पुन्हा कार्यरथ झाल्यात.

काल रात्री पुन्हा एकदा इन्स्टाग्राम आणि फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटचे सर्व्हर बंद पडले. भारतीय वेळेनुसार रात्री 12:11 वाजता इन्स्टाग्रामचा सर्व्हर डाऊन झाला. फेसबुकचे सर्व्हर भारतीय वेळेनुसार रात्री 12.17 वाजता बंद पडला. फेसबुकचे सर्व्हर अमेरिका, यूके, पोलंड आणि जर्मनीच्या काही भागात बंद होते.

या संपूर्ण घटनेवर फेसबुक आणि इन्स्टाग्राम या दोघांनी ट्विट करून आपल्या यूजर्सची माफी मागितली आहे. यापूर्वी 5 ऑक्टोबर रोजी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपचे सर्व्हर 6 तासांहून अधिक काळ बंद होते. यामुळे जगभरात फेसबुकवर प्रचंड संताप निर्माण झाला. तसेच फेसबुकने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.