'या' सॉफ्टवेअरने काही मिनिटात होईल डीएनए टेस्ट!

संशोधकांनी एक नवीन सॉफ्टवेअर विकसित केले आहे. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 5, 2017, 10:23 AM IST
'या' सॉफ्टवेअरने काही मिनिटात होईल डीएनए टेस्ट! title=

न्यूयॉर्क : संशोधकांनी एक नवीन सॉफ्टवेअर विकसित केले आहे. ज्यामुळे व्यक्तीच्या डीएनए आणि सेल्सची ओळख काही मिनिटात पटेल. ‘ईलाइफ’ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार याचा सर्वाधिक उपयोग कॅन्सरच्या पेशींचे निदान करण्यास होईल. 

यामागील उद्देश

अमेरिकेतील कोलंबिया विश्वविद्यालयाचे यानीव एरलिच यांनी सांगितले की, या सॉफ्टवेअरचा समाज्यासाठी काही फायदा व्हावा आणि नवे तंत्रज्ञान प्रस्थापित करणे, हा यामागील उद्देश आहे. त्यांनी सांगितले की, आम्ही कॅन्सर सेल्सचे निदान करणाऱ्या क्षमता आणि नवीन उपचारपद्धतीबद्दल अत्यंत उत्सुक आहोत. हे सॉफ्टवेअर ‘मिनआयन’वर काम करेल.

कसे असेल हे उपकरण ?

हे उपकरण क्रेडिट कार्डच्या आकारचे असेल आणि त्याला असलेल्या सूक्ष्म छिद्रांमुळे तो वेगवेगळे डीएनए खेचून घेतो. त्यानंतर ते न्यूक्लियोटाईड किंवा डीएनएच्या अक्षरांचे ए टी सी जी असे क्रमवार विश्लेषण करते. वेगवेगळ्या प्रकारच्या जीवाणुंवर आणि विषाणुंवर अभ्यास करुन हे उपकरण विकसित करण्यात आले आहे. मात्र मानवी पेशींवर अध्ययन करण्यासाठी याच्या काही मर्यादा आहेत.