'हे' पासवर्ड आहेत धोकादायक ! लवकर बदला अन्यथा...

पासवर्ड हॅक करण्याच्या कृतीत वाढ झाली आहे. 

Updated: Apr 23, 2019, 12:58 PM IST
'हे' पासवर्ड आहेत धोकादायक ! लवकर बदला अन्यथा... title=

मुंबई: अनेकदा पाहिलं जातं की, काही लोक त्यांच्या संवेदनशील अकाऊंटवर लक्षात राहतील असे पासवर्ड ठेवतात. पासवर्ड जितके सोपे असतात, तेवढेच त्यांना हॅक करणे अधिक सोपे जाते. पासवर्ड नेहमी सुरक्षित असायला पाहिजे असे वारंवार सांगितले जाते. तरीदेखील काहीजणं त्यांचा पासवर्ड लक्षात राहावे म्हणून सोपे पासवर्ड निवडतात. त्यामुळे हॅकरला त्यांचा पासवर्ड मिळवणे अधिक सोपं होतं. पासवर्ड हॅक करण्याच्या कृतीत वाढ झाली आहे. यामुळे नॅशनल सायबर सेक्युरिटी सेंटरने लोकांना सावध करण्यासाठी हे पाऊल उचललं आहे.

नॅशनल सायबर सेक्युरिचटी सेंटरच्या अहवालानुसार, असुरक्षित पासवर्डच्या यादीत १२३४५६ हा पासवर्ड पहिल्या स्थानावर आहे. तसेच क्वर्टी (QWERTY) हा पासवर्डचा दुसऱ्या स्थानावर आहे. १२३४५६ हा पासवर्ड वापरणारे सुमारे २ कोटी ३० लाखाहून अधिक आहेत. तसेच काही नावांची यादी आहे. याचा युजर पासवर्ड म्हणून वापर करतात. या नावांमध्ये मायकल, डेनियल, जेसिका, चार्ली यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. त्याच बरोबर '११११११११' आणि 'password' या शब्दाचाही पासवर्ड म्हणून वापर केला जात आहे.

नॅशनल सायबर सेक्युरिचटी सेंटरचे अधिकारी, इयान लेवी म्हणाले की, ज्या पासवर्ड मध्ये युजर्स त्यांच्या ओळखीच्या नावांचा समावेश करतो. तसेच आवडीच्या व्यक्तीच्या नावाचा पासवर्ड ठेवतो. अशा पासवर्डला हॅक करणे अधिक सोपे असते. याची युजर्सने काळजी घ्यावी.