भारतात Whatsapp नाही तर या Appला पहिली पसंती

'या' ऍपने सर्वाधिक डाऊनलोड करण्यात आलेल्या व्हॉट्सअपलाही मागे टाकलं आहे.  

Updated: Mar 2, 2020, 12:25 PM IST
भारतात Whatsapp नाही तर या Appला पहिली पसंती
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : सोशल मीडिया जगात फेसबुक, व्हॉट्सअप प्रसिद्ध मेसेजिंग ऍप आहेत. हे ऍप्स डाऊनलोड करुन वापरणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. व्हॉट्सअप जगातील सर्वाधिक डाऊनलोड केलं जाणारं ऍप आहे. पण आता हे ऍप डाऊनलोडमध्ये मागे पडलं आहे. जानेवारी २०२०मध्ये, सर्वाधिक डाऊनलोड करणाऱ्या  ऍपमध्ये टिकटॉक TikTok ऍपने बाजी मारली आहे. डाऊनलोडच्या बाबतीत टिकटॉकने व्हॉट्सअपला मागे टाकलं आहे. Whatsapp नाही तर TikTok Appला जगभरात पहिली पसंती मिळत असल्याचं चित्र आहे.

नोव्हेंबर २०१९ मध्ये, TikTokने ऍप स्टोअर आणि गूगल प्ले स्टोरवर जवळपास १.५ बिलियन ऍप डाऊनलोड मार्क केले आहेत. ज्यात भारतात डाऊनलोडचा सर्वात मोठा भाग आहे.  TikTokला भारत आणि ब्राजीलसांरख्या बाजारात मोठी लोकप्रियता आहे. TikTok त्याच्या शॉर्ट-व्हिडिओ कन्टेंट प्लॅटफॉर्ममुळे यूजर्समध्ये ट्रेंड करतो.

TikTokने, जगात सर्वाधिक डाऊनलोड करण्यात आलेलं ऍप whatsappला मागे टाकलं आहे. 

एका रिपोर्टनुसार, भारतात नोव्हेंबर २०१९मध्ये, २७७.६ मिलियन TikTok app डाऊनलोड करण्यात आले होते. जानेवारी २०१९शी तुलना केल्यास, जानेवारी २०२० मध्ये डाऊनलोडच्या संख्येत ४६ टक्क्यांची वाढ झाली आहे.

TikTokचा आतापर्यंतचा डाऊनलोडचा आकडा १८२ कोटींपर्यंत पोहचला आहे. ट्रेंडनुसार, फेब्रुवारी महिन्यात डाऊनलोडची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. TikTok appला ७.७ मिलियन वेळा इन्स्टॉल करण्यात आलं आहे.

टिकटॉक छोटे-छोटे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. छोट्या फॉर्मेटमध्ये केलेले हे व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड होतात. सध्या टिकटॉक ऍपवर स्कल ब्रेकर चॅलेंज व्हायरल होतेय. तरुणांमध्ये तर या चॅलेंजची चागंलीच चर्चा आहे. पण हे चॅलेंज जीवावर बेतणारं, प्राणघातक असल्याचं सांगण्यात आलं असून शेअर न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या चॅलेंजबाबत सरकारने एक सल्लाही जाहीर केला आहे. inistry of Electronics and information Technologyने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स टिकटॉक, यूट्यूब, ट्विटर आणि फेसबुकला स्कल ब्रेकर चॅलेंजचे व्हिडिओ हटविण्याचं सांगण्यात आलं आहे.