Toyota ने आणली सर्वात स्वस्त 7 सीटर कार, जबरदस्त मायलेज आणि भन्नाट फिचर्स; पेट्रोलसह CNG व्हेरियंटही लाँच

Toyota Rumion ही मारुती सुझुकीची (Maruti Suzuki) प्रसिद्ध एमपीव्ही Ertiga वर आधारित आहे. या कारला हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलं आहे. यामध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अनेक अॅडव्हान्स सेफ्टी फिचर्स देण्यात आले आहे. कंपनीने पेट्रोल इंजिनसह सीएनजी व्हेरियंटही बाजारात आणलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Aug 10, 2023, 03:11 PM IST
Toyota ने आणली सर्वात स्वस्त 7 सीटर कार, जबरदस्त मायलेज आणि भन्नाट फिचर्स; पेट्रोलसह CNG व्हेरियंटही लाँच title=

टोयोटाने भारतीय बाजारपेठेत आपली सर्वात स्वस्त सात सीटर कार Toyota Rumion ला सादर केलं आहे. गेल्या अनेक वेळापासून या कारची चर्चा सुरु होती. टोयोटाची ही नवी कार मारुती सुझुकीची (Maruti Suzuki) प्रसिद्ध एमपीव्ही Ertiga वर आधारित आहे. सध्या ही कार फक्त प्रदर्शनासाठी समोर आणली असून किंमत आणि बुकिंग डिटेल्स लवकरच अधिकृतपणे जाहीर केले जाणार आहेत. पण कंपनीच्या पोर्टफोलियोत ही सर्वात स्वस्त एंट्री लेव्हल 7 सीटर कार आहे. 

ही कार विक्रीसाठी उपलब्ध झाल्याननंतर टोयोटाकडे सर्वात जास्त एमपीवही गाड्या असतील. ज्यामध्ये इनोव्हा क्रिस्टा, इनोव्हा हायक्रॉस, वेलफायर यांचा समावेश असून, आता रुमियन सहभागी होईल. बलेनोवर आधारित ग्लांजाप्रमाणे मारुती अर्टिगावर आधारित एमपीव्ही तयार करण्याची आणि पुरवठा करण्याची जबाबदारीही मारुती सुझुकीवर असेल. या कारमध्ये थोडे बदल करण्यात आले आहेत, जे या कारला मारुती अर्टिगापासून वेगळं करतात. 

कशी आहे Toyota Rumion - 

टोयोटाचं म्हणणं आहे की, टोयोटा रुमियनला आरामदायी तसंच सर्व फिचर्स आणि चांगला परफॉर्मन्सची अपेक्षा असणाऱ्या कुटुबांच्या इच्छेप्रमाणे डिझाईन करण्यात आलं आहे. कारमधील मोठे केबिन आणि इंटिरियरमध्ये दिले जाणारे अॅडव्हान्स फिचर्स ग्राहकांनी सहजपणे ड्रायव्हिंग करण्याचा अनुभव देतील. कंपनीने या कारमध्ये पेट्रोल इंजिनसह नियो ड्राइव्ह तंत्रज्ञान (इंटीग्रेटेड स्टार्टर जेनरेटर - आईएसजी) आणि ई-सीएनजी तंत्रज्ञान दिलं आहे. 

पॉवर आणि परफॉर्मन्स

Toyota Rumion मध्ये कंपनीने 1.5 लीटरच्या क्षमतेचं K-सीरिज इंजिन वापरलं आहे, जे आर्टिगाप्रमाणे CNG पर्यायासह उपलब्ध असेल. पेट्रोल मोडमध्ये ही कार 75.8 kw क्षमतेचं पॉवर आऊटपूट आणि 136.8 Nm चा टॉर्क जनरेतट करते. तर सीएनजी मोडमध्ये हे इंजिन 64.6 kw ची पॉवर आणि 121.5 Nm चा टॉर्क जनरेट करतं. या इंजिनला 5-स्पीड मॅन्यूअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह जोडण्यात आलं आहे. 

मायलेज

कंपनीचा दावा आहे की, नवं नियो ड्राइव्ह आणि ई-सीएनजी तंत्रज्ञान या कारला चांगला मायलेज देण्यात सक्षम बनवतं. टोयोटाचा दावा आहे की, याचं पेट्रोल व्हर्जन 20.51 किमी प्रतिलीटर आणि सीएनजी व्हेरियंट 26.11 किलो प्रतिकिलो पर्यंतचा मायलेज देतं. ही कार पेट्रोल (नियो ड्राइव्ह) आणि सीएनजी म्हणजे दोन्ही इंधन पर्यायात उपलब्ध असणार आहे.

फिचर्स काय?

Toyota Rumion वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कार प्लेसह 17.78 cm स्मार्ट प्ले कास्ट टच स्क्रीन ऑडिओ सिस्टम, टोयोटा i-Connect 55 Plus, रिमोट क्लायमेट कंट्रोल, लॉक/अनलॉक, स्मार्टवॉच कंपॅटिबिलिटी, व्हेईकल हेल्थ मॉनिटरिंग यासारखे फिचर्स देण्यात आले आहेत. 

तसंच कारमध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड झाल्यास अलर्ट सर्व्हिस कनेक्ट देण्यात आला आहे. याशिवाय ऑटो कोलिजन नोटिफिकेशन, टो अलर्ट, फाइंड माय कार, पॅडल शिफ्टर्ससह 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि क्रूझ कंट्रोल यांसारखे फिचर्स उपलब्ध आहेत.